तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 8 April 2020

परळीत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने गरजूंना घरपोंच रेशन

पंकजाताई मुंडे संकटसमयी धावल्या - जुगलकिशोर लोहिया, निळकंठ चाटे 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणा-या गोरगरीब, कष्टकरी गरजू नागरिकांच्या मदतीसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे धावून आल्या असून गरजू रहिवाशांना रेशन व किराणा साहित्याचे घरपोंच वाटप केले जात असल्याचे भाजपाचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया,  युवा नेते निळकंट चाटे यांनी कळविले आहे. 

  सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन आहे, हातावर पोट असणारे, रोजंदारी, कष्टकरी कामगार व गोरगरीब जनता यामुळे मोठ्या अडचणीत सापडली आहे, त्यांचा रोजगार बंद झाला आहे. अशा कठीण प्रसंगात पंकजाताई मुंडे व खा डॉ. प्रितमताई मुंडे यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. याही वेळेला त्या धावून आल्या आहेत. गोरगरीब, कष्टकरी वर्गाला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने घरपोंच रेशन तसेच किराणा साहित्य वाटप केले असल्याचे सांगून गरजूंना ३ किलो गव्हाचे पीठ, २ किलो तांदूळ, तुर दाळ, साखर, गोडतेल, चना, मीठ पुडा, मिरची व हळद पावडर, साबण आदी साहित्य वाटप केले जात आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने यापूर्वीही गोरगरीबांना मदत, ऊसतोड मजूरांच्या पाल्यांना शैक्षणिक सहकार्य, सामुदायिक विवाह सोहळा, आरोग्य शिबीर, वैद्यकीय मदत आदीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे असेही जुगलकिशोर लोहिया, निळकंठ चाटे व यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment