तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 April 2020

कोरोना दक्षता जनजागृती करणा-या कलावंताचे पालकमंत्र्यांकडून कौतुकअमरावती :- 
         स्थानिक मनोज पडोळे या चित्रकार कलावंताने सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर उद्बोधक चित्रांच्या माध्यमातून  दक्षतापालनाबाबत जनजागृतीची मोहिमच हाती घेतली आहे. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी या चित्रांचे अवलोकन करून श्री. पडोळे यांचे कौतुक केले आहे.
         कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असताना विविध स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते यांच्यासह कलावंत, विद्यार्थी, महिला, नागरिक यांचेही पाठबळ मिळत आहे. श्री. पडोळे यांचा जनजागृतीसाठीचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            कोरोना विषाणूपासून बचावासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत श्री. पडोळे यांनी आकर्षक आणि कलात्मक चित्रण सार्वजनिक रस्ते, भिंती, इमारती यावर केले आहे. सामाजिक सुरक्षिततेसाठी योगदान देणा-या डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी यांचे मनोबल वाढविणारी चित्रेही त्यात समाविष्ट आहेत. उत्तम रंगसंगती व  रेखाटनांमुळे ही चित्रे लक्षवेधी ठरली आहेत.  अंगणवाडी सेविकाही कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये मोलाचे योगदान देत आहेत. त्यांचाही समावेश या चित्रांत व्हावा, अशी सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केली.जमील पठाण
8805381333 /8804935111

No comments:

Post a comment