तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 April 2020

कोरोना आपत्ती निवारण्यासाठी प्रकुलगुरु डॉ जोगेद्रसिंह बिसेन यांची पंतप्रधान सहाय्यता निधीस एक लाख रुपयांची मदतपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले. देशासह राज्यात कोरोनाचे महाभयंकर संकट वाढत चालले आहे. त्या अनुषंगाने कोरोना आपत्ती निवारण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे प्रकुलगुरु डॉ जोगेद्रसिंह बिसेन सरांनी यांची पंतप्रधान सहायता निधी साठी एक लाख रुपयांचा निधी आर्थिक मदत जमा  केली.
            जगभरासह देशात व राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. या विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी केंद्रबरोबरच राज्य शासन विविध उपाय योजत आहे. त्याचबरोबर कोरोना बाधितांची योग्य ती काळजी घेऊन रुग्णांना बरे करण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा अविरत झटत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनावर मात करून देशातील जनतेला संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजना करिता मोठा निधी जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला 'पीएम केअर फंड' साठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत 1,00,000  रुपये जमा करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोरोना विरुद्ध लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर हा निधी जमा केला असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळकटी देण्यासाठीआहे. आज संपूर्ण देश एकजुटीने कोरोना विरुद्ध लढत आहे.आपणही या लढ्यात खारीचा वाटा उचलून योगदान देऊ शकतो. तसेच कोरोनाचा लढा गांभीर्याने घ्यावा, आपल्या घरात सुरक्षेतेसाठी, घरात बसूया आणि कोरोनाला हद्दपार करूया असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे प्रकुलगुरु डॉ. जोगेद्रसिंह बिसेन सरांनी केले आहे. तसेच या कार्यामुळे प्रकुलगुरु डॉ. जोगेद्रसिंह बिसेन सरांचे प्रा.डॉ. नागोराव पाळवदे, प्रा.डॉ. माधवराव पाटील, प्रा.डॉ. भगवान शेंडगे, प्रा.डॉ. ग्यानदेव उपाडे, प्रा.डॉ. शिवाजी वैद्य, प्रा.डॉ. एन.व्ही.शिंगापुरे, प्रा.डॉ. मदनसिंग ठाकूर, प्रा.गनाचार्य  यांच्यासह प्राचार्य, प्राध्यापक मंडळी व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a comment