तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 April 2020

कौठळी येथे सरपंच, उपसरपंच व प्रशासनाच्या उपस्थित मोफत रेशनचे धान्य सुरळीतपणे वाटप


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गमुळे चिंताग्रस्त आहेत. संपूर्ण देशात लाँकडाऊन व संचारबंदी आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात जिल्हाबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाचे नियमांचे पालन, सोशल डिस्टन्सचे पालन करून सर्व कार्ड धारकांना घरपोच मोफत राशन स्वस्त धान्य दुकानदार व सरपंच मधुकर झिंजुर्डे , उपसरपंच भालचंद्र गुंजकर व प्रशासनाच्या यांच्या उपस्थितीत सुरळीतपणे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या संकटात गोरगरीबांचे हाल होत आहेत. त्यामुळे रेशनच्या माध्यमातून सर्वांना सुरळीतपणे वाटप करण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन सरपंच झिंजुर्डे व उपसरपंच गुंजकर यांनी केले आहे. 
       जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लागू असलेले लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणं धोक्याचे बनलं आहे. कोरोना ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गोरगरीब नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन आहे, हातावर पोट असणारे, रोजंदारी, कष्टकरी कामगार व गोरगरीब जनता यामुळे मोठ्या अडचणीत सापडली आहे.    
संपूर्ण देशात लाकडाऊन घोषित करण्यात आले आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात जनजीवन जागच्या जागीच थांबले आहे. या शिवाय स्थानिक नागरिकांच्या हाताला काम नसल्यामुळे मजूरीची रक्कम मिळत नाही गाेर गरीब जनतेची अक्षरशा फरफट होत आहे. सदरहु मजूरांना व गरीबांना अन्नधान्य मिळत नाही त्यामुळे साहजिकच त्यांचे कुंटुबियाला उपासमारी ला समाेर जावे लागत आहे. प्रशासनाने अश्या गरीब व मजूर लोकांना तात्काळ रेशन कार्डव्दारे मोफत धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. तांदळासह गहू मोफत वाटप करून स्वस्त धान्य दुकानदारावर दत्ता घुगे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून हे रेशनकार्ड धारक कुटुंबांना धान्य मोफत घरपोच सुरळीतपणे वाटप करण्यात येत आहे.  संचारबंदीत गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना रेशनचे धान्य घरपोच पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांनी पुढाकार घेतला आहे. यावेळी सरपंच मधुकर झिंजुर्डे, उपसरपंच भालचंद्र गुंजकर, तलाठी गित्ते मँडम, ग्रामसेवक काळे, शिक्षक नानवटे व हजारे यांच्या उपस्थितीत सुरळीतपणे वाटप सुरू आहे. दरम्यान शासनाने रेशन कार्ड धारकांना तांदूळ मोफत दिला होता. परंतु स्वस्त धान्य दुकानदार रंगनाथ केंद्रे व दत्ता घुगे यांनी गहू मोफत घरपोच वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

No comments:

Post a comment