तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 April 2020

लोणी खुर्द येथील ऋग्वेद क्लिनिक येथे तपासणी फी विनामूल्य...


शांताराम मगर प्रतिनिधि वैजापुर.
वैजापुर तालुक्यातील ऋग्वेद क्लिनिक  येथील डाॅ.नयन मोरे यांनी तपासणी हि विनामूल्य केली आसुसून  जगभरात यमदूत ठरलेल्या कोणाशी लढा देण्यासाठी अनेक चळवळी उभ्या राहत आहेत. लोणी खुर्द येथील डॉ.नयनकुमार मोरे यांचे ऋग्वेद क्लिनिक येथे रुग्णांसाठी विनामूल्य रुग्ण तपासणी सेवा सुरु करण्यात आली आहे. दिनांक 8एप्रिल2020 पासून दिनांक 14 एप्रिल 2020 पर्यंत कोरोनाच्या  प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनआहे यातच ग्रामीण भागातील जनतेचे शेतमजुरांचे शेतकऱ्यांचे सर्व व्यवहार थांबलेली आहेत हाताला पैसा नसल्याकारणाने त्यांना दवाखान्यात ही जाता येत नाही अशा गरजू लोकांसाठी डॉ. नयनकुमार गोरखनाथ मोरे हे रुग्ण सेवा पूर्णपणे विनामूल्य देत आहेत.  समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या अनुषंगाने सेवा पूर्णपणे विनामूल्य देण्यात येत आहे. तसेच पोलीस प्रशासनास सहकार्य करून नागरिकांनी घरीच राहावे व सुरक्षित रहावे असा संदेशही त्यांनी दिला. रुग्णालयात येताना  रुग्णांनी रुमाल किंवा मास्कचा वापर करावा. सुरक्षित अंतर ठेवून रूग्णालयात बसावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान डाॅ नयन मोरे यांनी केले आहे.त्यांचे सर्व स्तरातून आभार व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment