तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 8 April 2020

स्वंयम शिक्षण प्रयोग संस्थेकडून कोरोना बद्दल गावा गावात मोठया प्रमाणात जनजागृती



आकाश लश्करे
उस्मानाबाद

कोरोना या विषाणू जन रोगाने संपूर्ण जगात मोठया प्रमाणावर धुमाकूळ  घातला असून कोरोना  चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत असून संचार बंदी मुळे अनेकांचा रोजगार बंद झाला आहे अश्या गरजू कुटुंबांना कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घ्यावी या बाबत 
महोतरवाडी या गावा मध्ये स्वंयम शिक्षण प्रयोग च्या गावपातळीवर काम करणारया कृषी संवाद सहाय्यक  गीता विष्णू चौहान या प्रत्येक घरी जाऊन कोरोना या भयानक रोगा बद्दल माहिती सांगत आहेत तसेच गावातील गोरगरीब लोकांना तसेच विधवा अपंग परितकता अशा लोकांची लिस्ट काढून स्वंयम शिक्षण प्रयोग च्या संवाद सहाय्यक गीता विष्णू चौहान यांनी या लोकांची परिस्थिती पहाता स्वखर्चाने भाजी पाला  तसेच तांदूळ आणि गहू यांचे विधवा अपंग अशा आठ ते दहा अतिशय गरीब गरजू लोकांना प्रत्येकाच्या घरी जाऊन वाटप करण्यात आले  तसेच प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन कोरोना या रोगा बद्दल आपली आणि आपल्या परिवाराची कशी काळजी घेतली पाहिजे असे सांगण्यात आले वारंवार हात धुणे बाहेर जाताना अत्यावश्यक काम असेल तर तोंडाला मास्क घालून जाणे घरा बाहेर नाही निघणे अशी माहिती देण्यात आली 
स्वंयम शिक्षण प्रयोग संस्था उस्मानाबाद गेल्या 25 वर्षा पासून शाश्वत शेती महिला नेतृत्वाखाली महिला सक्षमिकरण आणि व्यवसायीकता या बद्दल काम करते या मध्ये स्वंयम शिक्षण प्रयोग च्या डायरेक्टर प्रेमाताई गोपालन पाटील सर प्रोग्राम डायरेक्टर मोमीन तब्बसुम मॅडम यांनी महिलांना अशा परिस्थिती मध्ये महिलांना ट्रेनिंग सुजाता पाटील तालुका समन्वयक यांच्या अंतर्गत दिले अशा परिस्थितीत उस्मानाबाद तालुक्यातील 48 गावा मध्ये प्रत्येक गावातील संवाद सहाय्यक गावा मध्ये जनजागृती करत आहेत तसेच 
संस्थेच्या वतीने विविध उपक्रम गाव पातळीवरील घेतले जातात सेंद्रिय शेती व्यवसायीक महिलांना प्रशिक्षण व फंड देऊन व्यवसाय उभारणी याच बरोबर विविध विषयांवर प्रशिक्षण या मध्ये आत्मा व पोखरा कृषी विभागा कडून महिलांना विविध शासकीय योजना तसेच तळागाळातील महिलांना रोजगार मिळवून देण्याचे काम केले जात असल्याचे स्वंयम शिक्षण प्रयोग चे जिल्हा  समन्वयक बाळू काळदाते सर तसेच तालुका समन्वयक सुजाता पाटील यांनी सांगितले

No comments:

Post a Comment