तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 April 2020

डाकिया डाक लाया... डाकिया किराना


 किट लाया !

बीड पोस्टल क्रेडिट सोसायटीच्या वतीने किराणा साहित्याचे वाटप.

बीड (प्रतिनिधी)  दि.18 संपूर्ण जगामध्ये पुर्णा विषाणूने थैमान घातले असल्या मुळे संपूर्ण देश सध्या तीन तारखे पर्यंत लाॅकडाऊन आहे. आज गरीब कष्टकरी मजूर, हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या उपजीविके साठी लागणार किराणा अशा हलाखीच्या परिस्थिती मध्ये घेण्या इतपत पैसे नाहीयेत या कारणाने आपल्या भागातील कुणीही असा गरजवंत उपाशी राहू नये हा उदात्त हेतू डोळ्या समोर ठेवून समाजाची बांधिलकी जोपासत बीड पोस्टल डिव्हिजन को-ऑप क्रेडिट सोसायटी च्या वतीने एक ठराव घेऊन सोसायटीच्या नफ्यातील काही निधी हा अशा गरजवंत लोकांच्या साहित्य वाटपासाठी मंजूर करून त्या निधीतून किराणा साहित्य खरेदी करून, त्याचे कीट बनवण्यात आले होते वाटप करण्याचा शुभारंभ आज करण्यात आला दि.18 शनिवार पासून करण्यात आला आहे.
बीड पोस्टल डिव्हिजन को-आप क्रेडिट सोसायटी ही महाराष्ट्रात पहिली अशी सोसायटी आहे जिने गरजवंत लोकांना आपल्या नफा मधून हे किराणा किट साहित्य वाटून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे
डाकिया डाक नहीं लाया लेकिन, डाकिया इस बार किराना किट लाया है, 
निश्चितपणे असे उपक्रम इतर संस्थांनी देखील आपल्या संस्थे मार्फत राबवावेत  ही अपेक्षा आहे. पोस्टल सोसायटीच्या वतीने देण्यात येणार किटमध्ये खालील साहित्य किरण आहे,
 तांदूळ, तूरडाळ, शेंगदाणे, गोडतेल पुडा, मिरची, हाळद,अंगाचा साबण कपड्याचे साबण, असे जीवन उपयोगी किराणा देऊनअत्यंत हलाखीची परिस्थिती व गरीब त्यांचे हातावर पोट आहे अशा गरजवंत शोधून त्यांना किरणा किट देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मार्गदर्शक शिवाजी बडे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीडया उपक्रमाचे प्रमुख व सोसायटीचे संचालक अनिरुद्ध खडकीकर, बाबासाहेब मोरे, प्रशांत मेढे, अमरसिंग ढाका, बाबासाहेब जाधव, विष्णू वीर भारत कोठुळे, वसंत भानुसे, किरण सावंत, भानुदास मुंडे, मुकुंद टाक श्रीमती मंदाकिनी मिरगे, श्रीमती मोनालिसा घोडके, कर्मचारी सचिन रोकडे, शिवाजी पवार, वैष्णव, आदींची उपस्थिती मध्ये वाटपाचा कार्यक्रम चालू आहे.

No comments:

Post a comment