तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 April 2020

कोरोनाच्या संकटात योगदान देणारे सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार व पत्रकार यांना विमा संरक्षण द्या- राजेश गित्तेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- जग कोरोनासारख्या संकटाला सामोरे जात आहे. यामध्ये डॉक्टर,आरोग्य कर्मचारी, पोलीस, ग्रामसेवक हे ज्या प्रमाणे नागरीकांची काळजी घेवुन काम करीत आहेत.त्याच प्रमाणे ग्रामीण भागात गावातील सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार तसेच पत्रकार यांना विमा संरक्षण द्या, अशी मागणी भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांनी केली आहे. 
                जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लागू असलेले लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणं धोक्याचे बनलं आहे. कोरोना ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गोरगरीब नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाच्या संकटाचा सामना प्रत्येकजण जबाबदारी निहाय करीत आहे. सरकारने डॉक्टर,आरोग्य कर्मचारी, पोलीस, ग्रामसेवक या विमा संरक्षण जाहीर केले आहे. सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील आपल्या आरोग्याची परवा न करता गावपातळीवर कार्य करत असून त्यांनी कोरोना हे संकट वेशीबाहेर ठेवण्यात यश येत आहे. या घटकांनाही 
सरकारने संरक्षण जाहीर करावे, गावात स्वस्त धान्य दुकानदार सुध्दा संवेदना ठेवून मालाचे वितरण करत असल्याने गोरगरिबांच्या अन्न-पाण्याची सोय होत आहे. सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, यांनी कोरोनाच्या लढाईत उत्कृष्ट कामगिरी करीत आहेत. त्यांच्या पुढे अनेक प्रश्न निर्माण झाले असतांनाही ते काम चांगल्या प्रकारे हाताळीत आहेत. तर शहरात साधन सुविधा खुप असतात त्या प्रमाणात गावात सुविध नसतात अशा परिस्थितीत ही गावात जनजागृती, औषध फवारणी, गोरगरीब यांना मदत, कुठलेही प्रश्न सोडवण्यासाठी भूमिका बजावतात. तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार हे पण कोरोनाच्या लढाईत जिवाची परवा न करता ग्राऊंडवर जाऊन बातमी तयार करतात व ती बातमी आपल्या पर्यंत पोहोंचती करतात त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. या सर्व घटकांना राज्य सरकारने कोरोनाच्या संकटात योगदान देणाऱ्या डॉक्टर,आरोग्य कर्मचारी, पोलीस, ग्रामसेवक यांना विमा कवच दिला आहे. याच धर्तीवर कोरोना संकटकाळात उत्तम कामगिरी करणाऱ्यांना त्या मंडळीमध्ये हे पण आहेत. तरी शासनाने कोरोनाच्या संकटात सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार व पत्रकार यांना विमा संरक्षण द्या अशी मागणी भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांनी केले आहे.

No comments:

Post a comment