तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 April 2020

माजलगाव तालुक्यातील विलगिकरन कक्षातील ऊसतोड मजुरांच्या कुटुंबांना पर्याय औरंगाबाद , मराठवाडा लोक विकास मंच व सोनदरा गुरुकुलम ची मदत


बीड (प्रतिनिधी) : -  COVID-१९ (कोरोना) च्या साथीच्या रोगाने जगभर थैमान घातले आहे. बीड जिल्ह्यातील अतिदक्ष प्रशासनामुळे आत्तापर्यंत कोरोनापासून एक अपवाद वगळता दूर राहण्यात यशस्वी झालेला आहे. बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड कामगार पुरवणारा जिल्हा अशीच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने व छोटे मोठे उद्योग व सेवा देण्यासाठी हजारो लोकं सहपरिवार स्थलांतरीत होत असतात. असंघटीत कामगारांपुढील सर्व समस्यांना तोंड देत हे काम करत असतात. टाळेबंदी घोषित झाल्यापासून बीड जिल्ह्यात हे सर्व परत येत आहेत. बीड जिल्ह्यामधील प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यांची नोंद करून घेतली आहे व त्यावर योग्य ती कार्यवाही सुरु आहे.

या काळात कोणी भुकेला राहू नये म्हणून स्थानिक पातळीवर अनेक लोक आणि संस्था मदतीचा हात पुढे करत आहेत. जिथे कोरोनाची लागण जास्त आहे अशा शहरी भागातून आलेल्या कुटुंबांना विलगिकरण कक्षात वेगळे ठेवले जात आहे. अशा कुटुंबाना सुद्धा मदत पोहचवली जात आहे. माजलगावच्या तहसीलदार प्रतिभा गोरे आणि मा.प्रकाश आघाव पाटील जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी विलगीकरण केलेली कुटुंब शोधून त्याची यादी बनवली. मा. जिल्हा पुरवठा  अधिकारी आघाव पाटील यांनी सामाजिक संस्थांना येथे मदत पोहचवण्याचे आवाहन केले. तातडीने सोनदरा गुरुकुलम डोमरी, औरंगाबाद येथील पर्याय संस्था व मराठवाडा लोक विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ तोडकर तयार झाले. दोन्ही संस्थांनी मिळून तात्काळ मदत पोहचवली. याचे समन्वय श्री. ओमप्रकाश गिरी (प्रकल्प संचालक, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प)व बाजीराव ढाकणे , बीड जिल्हा निमंत्रक , मराठवाडा लोक विकास मंच यांनी केले. 
तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी केलेल्या या आवाहनाला पुढील २४ तासांमध्ये माजलगाव तालुक्यातील राजेगाव , राजेवाडी पात्रुड ,केसापुरी कॕम्प या गावातील विलगिकरण कक्षातील  ८५ गरजू ऊसतोड मजुरांच्या कुटुंबांना मदत मिळाली. 

  पर्याय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मराठवाडा लोक विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष मा.विश्वनाथ तोडकर व सोनदरा गुरुकुलम्, डोमरी च्या माध्यमाणे वोवेल्स ऑफ द पिपल असोशिएन, पुणे यांनी संयुक्तपणे या कार्यात पुढाकार घेतला. मा. जिल्हाधिकारी राहुलजी रेखावार, मा. मुख्यकार्यकारी अधिकारी अजितजी कुंभार आणि जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. प्रकाश आघाव पाटील यांच्याशी तातडीने संवाद करत सध्या गरजू कुटुंब कुठे अडकले आहेत यांचा शोध सुरु केला. या साठी अनेक पत्रकार व समाजातील हितचिंतकांनी सुद्धा सहाय्य केले. आत्तापर्यंत बीड शहर, बीड लगतची काही गावं, केज व पाटोदा तालुका मिळून ६०० कुटुंबाना मदत पोहचवली आहे. ही मदत समाजातील अत्यंत गरजू कुटुंबापर्यंत पोहोचावी या साठी मा. जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब यांच्यासोबत सोनदरा गुरुकुलातील कार्यकर्ते श्री. अश्विन भोंडवे व श्री. रज्जाक पठाण , श्री. ओमप्रकाश गिरी(प्रकल्प संचालक, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प) बाजीराव ढाकणे , मराठवाडा लोक विकास मंचचे बीड जिल्हा निमंत्रक हे पूर्ण खात्रीशीर माहिती घेत आहेत. अशी माहिती सोनदराचे संचालक श्री. सुदाम भोंडवे आणि वोपाचे संचालक श्री.प्रफुल्ल शशिकांत व मराठवाडा लोक विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ तोडकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment