तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 April 2020

विविध ग्रापं कार्यालयांमध्ये महामानवांचा जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा..
आपत्कालीन परिस्थितीमूळे जन्मोत्सवा च्या आनंदावर विरजण..

मंगरूळपीर-(फुलचंद भगत)-भारत वर्षातील मानवतेसाठी केवळ आणि केवळ आपले आयुष्य खर्ची घालणाऱ्या महामानव डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या जन्मोत्सव आज सावरगाव कान्होबा आणि जोगलदरी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रापंचे सरपंच,पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

        आधुनिक भारताचे स्वप्न उराशी बाळगून सर्वसमावेशक अशा भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ज्यांनी प्रत्येक भारतीयांना स्वातंत्र्य दिले, दिशा दिली अशा महानायकांचा आज 129 वा जन्मदिवस सगळीकडे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
   भारतामध्ये मागील दोन आठवड्यापासून कोरोना या संसर्गजण्य घातक विषाणूच्या आगमनामुळे प्रत्येक नागरिक आज आपापल्या घरांमध्ये विलगीकरण अवस्थेत असल्यामुळे शासनाने महामानवाची जयंती सामाजिक दूरतेला तडा जाऊ न देता साजरी करण्याची  सुचना प्रत्येक शासकीय कार्यालय आणि नागरिकांना दिलेली होती. 
ग्रापं सावरगाव कान्होबाचे सरपंच भिमराव इंगोले यांनी आज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पो. पा. सुभाष राऊत यांच्या उपस्थितीमध्ये महानायकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साध्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस पार पाडला. 
 जोगलदरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महिला सरपंच विमलबाई पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यांचा जन्मोत्सव साजरा केला. यावेळी जोगलदरी चे माजी पोलीस पाटील शेषराव पवार आणि ग्रामपंचायत कर्मचारी यशपाल चव्हाण हे उपस्थित होते.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment