तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 April 2020

येवला तालुक्यातील सायगाव येथील मॉर्निंग ग्रुपच्या वतीने एक हात मदतीचा......  
प्रतिनिधी.संतोष बटाव येवला

आज कोरोना विषाणू ने जगातील सर्वच देशामध्ये मृत्यूचे तांडव केले आहे.
   त्याच पार्श्वभूमीवर भारतातही या कोरोना ने थैमान घातले आहे त्यामुळे सम्पूर्ण भारत लॉक डाऊन आहे त्याच बरोबर महाराष्ट्र देखील बंद असुन संचारबंदी व कलम 144 लागू आहे त्यामुळं कुठेही जात येता येत नाही त्याच बरोबर जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा निर्माण झाला आहे.
 तसेच रोजगार ठप्प आहे सर्व शासन व्यवस्था आज कोरोना विषाणू ला हरवण्यासाठी सज्ज झाली आहे परंतु जीवन जगण्यासाठी अन्नाची गरज असते म्हणूनच येवला तालुक्यातील सायगाव गावातील होतकरू तरुणांनी गोरगरीब मजूर ,ज्यांची आर्थिक सुबत्ता कमावणारे कुणी नाही अशा कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू म्हणून तांदूळ तेल मीठ आणि भाजी पाला वाटप करण्यात आल आहे...
   सुरवातीला स्वतःच्या गावातून सुरू केलेला हा ध्यास मॉर्निंग ग्रुपच्या वतीने इतर गावात देखील राबवला जात आहे .
पहिल्या टप्यात 40 कुटुंबाला सायगाव येथील आर्थिक दुर्बल घटकांना मदत केल्यानंतर मॉर्निंग ग्रुप चा इतर शेजारील गावात म्हणजेच पांजरवाडी,गोल्हेवाडी ,सायगाव,
न्याहारखेडा खु,न्याहारखेडा बु,या गावात देखील 55 कुटुंबाना मदत म्हणून तांदूळ भाजीपाला किराणा व कोरोना विषाणूला रोखण्यासाठी हँडव्वाश चे देखील वाटप करण्यात आले.या वेळी ज्याची आर्थिक परिस्थिती बेताची व कमावण्याचे काही साधन नाही अशा गरीब गरजू 55 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या पहिल्या टप्यात 40 कुटुंब व दुसऱ्या टप्यात 55 कुटुंब एकूण 95 कुटुंबाना मदतीचा हात मॉर्निंग ग्रुपच्या वतीने देण्यात आला सामाजिक स्तरांवर सर्वच व्यक्ती मॉर्निंग ग्रुप च कौतुक करत आहे हे अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे हे निश्चित .या वेळी मॉर्निंग ग्रुपचे सदस्य
शाहरुख शेख,,विक्रम देशमुख,मयूर खैरनार,दिपक खैरनार,अरुण जानराव ,प्राध्या.सुरेश देवरे वैभव खैरनार,हर्षल देशमुख,सिकंदर शेख,समीर पठारे,प्रशांत साबळे,सागर साबळे,सचिन वालतुरे,विजय उशीर,नवनाथ उशीर,गुलाब उशीर,कांतीलाल सोनवणे,एकनाथ भालेराव,अमोल येवले,विशाल कूळधर,किरण गाडेकर,सागर जेजुरकर,राजेंद्र पुंड,
या सर्वांनी सहकार्य केले

No comments:

Post a comment