तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 April 2020

मेडशीच्या एकमेव कोरोना बाधित रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्जवाशिम जिल्हा आता झाला कोरोनामुक्त

प्रशासनाचे नियोजन आणी लोकांच्या सहकार्यानेच जिल्हा ग्रिनझोन

वाशिम(फुलचंद भगत)- कोरोनाने सर्वञ थैमान घातलेले असतांना वाशिममध्येही एक कोरोना पाॅजिटिव्ह रुग्न आढळला होता परंतु नंतर सबंधित रुग्नाच्या टेष्ट निगेटिव्ह आल्याने जिल्हावाशियांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे.जिल्ह्यात 3 एप्रिल रोजी मेडशी येथील एक ६० वर्षीय वृद्ध कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल (ता.२४) त्यांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य विभागाने केलेल्या उपचारांमुळे हा रुग्ण कोरोनामुक्त झाला असून, आज त्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून रवाना केले. मात्र त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी सांगितले.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment