तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 April 2020

दिव्यांगाच्या राखीव निधीबाबत मंगरुळपीर नगर परिषद अनभिज्ञनिधीबाबत ऊडवाऊडवीची ऊत्तरे,अध्यक्षांनी विचारला जाब

मुख्याधिकार्‍यांची शहरविकासासाठी ऊदासिन वृत्ती,वरिष्ठांनी आढावा घेन्याची गरज

मंगरुळपीर(फुलचंद भगत)-कोरोनावर मात करण्यासाठी शासनाने संचारबंदीची घोषणा केली आहे.या काळात दिव्यांग व्यक्तींना अनेक समस्येंना सामोरे जावे लागत आहे.या पार्श्वभुमीवर दिव्यांगा राखीव निधितील ५% रक्कम जिवनावश्यक वस्तुसाठी खर्च करावी असे असतांना मंगरूळपीर येथील नगर परिषद याबाबतील अनभिज्ञ असल्याचे दिसते.
      अपंग कल्याण पुनर्वसन योजनेअंतर्गत दिव्यांगांना दरवर्षी काही नगर पालीकेच्या उत्पन्नातून ५ टक्के अपंग कल्याण निधी म्हणून दिल्या जाते. हा निधी अपंगांना धनादेश किंवा वस्तूंच्या स्वरूपात देण्यात येतो. परंतु यावर्षी कोरोनामुळे रक्कम आरटीजीएस (RTGS) स्वरूपात तत्काळ देण्याचे जिल्ह्यातील काही न.प.ने ठरवले व या नुसार रक्कम अपंगांच्या खात्यात जमा केली करण्यातही आली आहे.परंतु असे असतांना मंगरुळपीर येथील नगर परिषद माञ दिव्यांगाबाबत ऊदासिन दिसत आहे.लाॅकडाऊनच्या काळात तरी दिव्यांगासाठी जिवनावश्यक वस्तुवर हा राखीव निधी खर्च होणे अपेक्षित होते परंतु अजुनपर्यतही याबाबतीत सकारात्मकता दिसली नाही.त्यामुळे न.प.अध्यक्षा डाॅ.गझाला खान यांनी विभाग प्रमुखांना याबाबतील विचारणा केली असता ऊडवाऊडवीची ऊत्तरे आणी त्याविषयिची अनभिज्ञता दिसुन आली  त्यामुळे आतापर्यतचा दिव्यांगासाठीचा निधिही हडप झाला की काय अशी आशंकाही व्यक्त करन्यात येत आहे.केंद्र व राज्य शासनाच्या वतीने कोरोना व्हायरसबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असताना न.प.हद्दीतील दिव्यांगांना जीवन जगताना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात येत आहे. दरवर्षी दिव्यांगांना प्रशासना तर्फे दिवाळी दरम्यान आर्थिक मदत केली जाते मात्र यावर्षी कोरोनामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच दिव्यांगाना आर्थिक मदत करण्याचा  निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे पण मंगरुळपीर न.प.याबाबतीत ऊदासिन दिसुन येत आहे.शहरातील पाणीपुरवठाही सुरळीत नसल्याच्या तक्रारी खुद्द न.प.अध्यक्षांनी मुख्याधिकारी यांचेकडे लेखी स्वरुपात करुनही एक जबाबदार प्रशासकीय अधिकारी या संवेदनशिल प्रश्नाकडे डोळेझाक का करत आहे हाच प्रश्न शहरवाशीयांना पडलेला आहे.जिल्हाधिकारी यांनी दिव्यांग निधी तसेच पाणीपुरवठा याचा आढावा घ्यावा आणी याबाबतीलल्या दोषीवर कारवाई करावी अशी शहरवासीयांची मागणी होत आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment