तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 April 2020

आईच्या गोडजेवणाचा खर्च दिला मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ; ना.धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी व परिवाराचे सामाजिक भानपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
परळी येथील  गणेशपार भागातील प्रतिष्ठित व सर्व परिचित असलेल्या तथा ज्येष्ठ पत्रकार भास्करराव जोशी यांच्या पत्नी सौ. इंदुबाई  जोशी यांचे दि. २ एप्रिल रोजी  निधन झाले होते. क्षेत्रोपाध्याय वामनगुरु जोशी व ना. धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्या त्या मातोश्री होत्या. परंतु, कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपत्ती प्रसंगी सामाजिक भान राखून आपल्या आईच्या जोड जेवणावर होणारा खर्च कोरोनाग्रस्तांसाठीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला आहे.

या परिवारावर कोसळलेल्या दुःखात ऋणनिर्देश व्यक्त करताना सामाजिक भान जपण्याचा आदर्श जोशी कुटुंबियांनी सर्वांसमोर ठेवला आहे. आज त्यांच्या आईचा चौदावा दिवस आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून गंगापूजनाचा (गोड जेवणाचा/उत्तर कार्य) कार्यक्रमाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधी (कोविड-१९) ला देण्याचा निर्णय जोशी कुटुंबीयांनी घेतला आहे.

प्रशांत जोशी हे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून गेले अनेक वर्ष काम करतात. सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना सामाजिक जाणिवांचे भान त्यांनी जपले आहे. देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या या विपरीत परिस्थितीत स्वतःच्या कुटुंबीयांवर कोसळलेले दुःख बाजूला सारत व पारंपरिक गोष्टींना फाटा देत आपल्या आईच्या गोड जेवणावर होणारा खर्च त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिला.

No comments:

Post a comment