तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 7 April 2020

प्रशासनाने दिलेल्या वेळेत लोकांची जत्रेच्या स्वरूपात होणारी गर्दी टाळण्यासाठी


अपयशी नगरपालिकेने आणखी कठोर पावले उचलून नियोजन करावे-प्रा पवन मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  कोरोना या भयंकरच आजाराने देशासाहित  संपूर्ण  महाराष्ट्रात थैमान घातलेले असतांना परळीत मात्र प्रशासनाने दिलेल्या वेळेत लोक एखाद्या जत्रेच्या प्रमाणे मार्केट मध्ये गर्दी करत असून त्या वर परळी नगरपालिकेने अजून चांगल्या पद्धतीने पायबंद घालावा अशी मागणी भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.

     देशभरात व राज्यात कोरोना ने थैमान घातलेले असतांना  सुदैवाने आपला बीड जिल्ह्यात एक ही कोरोना रुग्ण आढळला नाही ही सध्य परिस्थितीत दिलासा देणारी बाब असून परळीतील लोकांनी बाहेर फिरन्यावार कंट्रोल करणे गरजेचे आहे,  संपूर्ण आठवडा भर पुरेल असे गृहउपयोगी सामान कुटुंबातील एकाच व्यक्तीने बाहेर पडून घेतले तर नक्कीच मोंढा परिसरात गर्दी होणार नाही प्रशासनाने जीवन आवश्यक गोष्टींची खरेदी करण्यासाठी दिलेल्या  वेळेचा नागरिकांनी दुरूपयोग करू नये या साठी परळी नगरपालिका प्रशासनाने आणखी कडक पाऊले उचलून नियोजन लावावे लॉक डाऊन तोडल्या मुळे होणारे दुष्परिणाम जनते पर्यंत परिणाम कारक पोचवणे नगरपालिका प्रशासनाने केले पाहिजे तसेच परळीतील अनेक भागात सॅनिटायझर ची फवारणी राहिली असून फवारणी करणारे मनुष्यबळ कमी असल्यामुळे न प प्रशासनाने एक मोठी टीम तयार करून शहरातील संपुर्ण भाग परत-परत सॅनिटाइझ करावा अशी मागणी व तसेच अनावश्यक होणारी गर्दी टाळण्या विषयी लवकरात लवकर चांगली उपाययोजना करावी अशी मागणी प्रा मुंडे यांनी केली आहे.

No comments:

Post a comment