तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानास सिल केल्यामुळे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  संचारबंदी शिथिलच्या काळात गुरुवारी सकाळी ग्राहकांची गर्दी आढळून आली. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाही म्हणून तहसीलदारांनी एका किराणा दुकानास सील केलं आहे. 

       परळीचे तहसिलदार डॉ. विपीन पाटील, न. प.चे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या उपस्थितित ही कारवाई केली. यापूर्वी 30 मार्च रोजी स्टेशन रोडवरील डूबे बंधूंचे दोन दुकाने सील केले होते. माफीनामानंतर त्यांची दुकाने पूर्ववत सुरू झाले आहेत. संचारबंदी लागू असल्याने परळी नगर परिषदेच्या वतीने दुकानावरील गर्दी टाळण्यासाठी व सोशल सोशल डिस्टन्सिंगचे नियम घालून त्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली होती. तरीही आज मोंढ्यातील शिंदे ट्रेडर्स वर ग्राहकांची गर्दी आढळून आली. त्यामुळे त्यांचे दुकानाला तहसील अधिकाऱ्यांनी सील केले आहे यावेळी नायब तहसीलदार बाबुराव रुपनर उपस्थित होते.

No comments:

Post a comment