तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 April 2020

जनतेच्या सेवेसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलीसांच्या आरोग्याची दैनंदिन तपासणी करा


समाजसेविका ज्योती ठाकरे यांची मागणी

वाशिम(फुलचंद भगत)-जिल्ह्यामध्ये कोरोणाचा शिरकाव झाल्याने प्रशासनासह पोलिस विभाग सतर्क झाला आहे.लोकांच्या सरंक्षणासाठी पोलिस बांधव राञदिवस कर्तव्यावर आहेत त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न वार्‍यावर सोडुन चालणार त्याकरीता कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पोलिसांचीही दैनंदिन आरोग्य तपासणी होणेही गरजेचे असल्याने प्रशासनाने तशी सुविधा करावी अशी मागणी समाजसेविका ज्योती ठाकरे यांनी प्रसिध्दीपञकाव्दारे केली आहे.
         कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पोलीस दल सतर्कपणे कर्तव्यावर आहे. अशावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा जनतेशी नित्य संपर्क येत असतो. पण, ज्या व्यक्तीशी संपर्क झाला आहे त्यास कोरोनाची लक्षणे आहेत किंवा कसे? हे माहित नसते. त्यामुळे कर्तव्यावर असताना नकळत पणे पोलीस कोरोना विषाणूच्या संपर्कात येऊ शकतात. हा धोका लक्षात घेता जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याची दैनंदिन तपासणी करावी अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मध्यम ते तीव्र खोकला, कोरडा खोकला, घशात खवखवणे, श्वास घेण्यास अडथळा, छातीत दुखणे, अशक्तपणा, ताप इ. सारखी लक्षणे आढळून आल्यास त्याविषयी पोलीस अधिक्षक कार्यालयास तात्काळ कळविण्यात यावे. यासाठी Health Cheeklist या नावाने ऑनलाईन स्प्रेडशिट तयार करण्यात यावी.
 यामुळे जिल्हा कोरोना मुक्त रहावा यासाठी काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोणहीती प्राथमिक लक्षणे आढळल्यास त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य व्हायला हवे. तसेच जिल्ह्यातील काही वैद्यकीय अधिकारी यांच्याशी मोबाईलद्वारे किंवा व्हीडीओकॉलद्वारे औषधांची माहिती घेऊन टेलिमेडीसीन पुरविण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी अशी मागणी समाजसेविका ज्योती ठाकरे यांनी केली आहे.पोलिसांची सुरक्षा ही आपले कर्तव्यच आहे कारण पोलिस बांधव लोकांच्या सुरक्षिततेसाठी राञंदिवस झटतात आणी आपले कर्तव्य बजावतात त्यामुळे प्रशासनाने ही बाब लक्षात घेवुन दैनंदिन आरोग्य तपासणीची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206/9763007835

1 comment:

 1. योग्य च आहे

  दिवस रात्र उन्हा मध्ये मछर मध्ये उभे राहून ड्युटी बजावत असतात... माझ्या मते योग्यच आहे


  राजकीय लोकांचे पगार वाढवण्या पेक्षा

  पोलिसांच्या आरोग्यासाठी तोच पैसा वापर
  करावा

  ReplyDelete