तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती विशेष


कोरोनामुळे यावर्षी नेहमीच्या उत्साहात जयंती सोहळा साजरा करणे शक्‍य नाही. घरी राहूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन सर्वच बौद्ध संघटनांनी केले आहे.
देशावर ओढवलेली परिस्थिती अत्यंत निराशाजनक आहे. अशावेळी "मी प्रथम भारतीय व अंतिमत: भारतीय' माणणाऱ्या या भारतरत्नाचे अनुयायी ही जयंती नेहमीप्रमाणे उत्साही स्वरूपात साजरी करणार नाही, हे आता निश्‍चित झाले आहे. मात्र, डीजिटल माध्यमाचा उपयोग करून बाबासाहेबांना अभिवादन करण्याची संकल्पना समाजबांधवांनी शोधली आहे. बाहेर पडण्याऐवजी घरातूनच डीजिटल माध्यमातून महामानवांच्या विचारांचा जागर केला जाणार आहे.
विश्वरत्न ,युगप्रवर्तक ,प्रज्ञासूर्य ,क्रांतिसुर्य, ज्ञानाचा अथांग सागर बोधिसत्व व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती  ही डिजिटल स्वरुपात साजरी करण्यात येत आहे. 
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे आदर्शवत असुन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. समाजाच्या तळागाळातील माणसाचा विकास होण्यासाठी,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर संघर्ष केला बाबासाहेबांचे कार्य हे सर्व समाजासाठी होते. या देशातील करोडो बहुजनांच्या आयुष्याचे सोने मात्र विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने झाले
*परिचय*
नाव:डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
जन्म14 एप्रील 1891
जन्मस्थान महू, इंदौर मध्यप्रदेश
वडिल
रामजी मालोजी सकपाळ
आई भीमाबाई मुबारदकर
पत्नी:पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935) 
दुसरी पत्नी: सविता आंबेडकर (1948.1956)
शिक्षण:एलफिन्सटन हायस्कुल, बाॅम्बे विश्वविद्यालय
1915 एम.ए. (अर्थशास्त्र)
1916 मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयातुन PHD
1921 मधे मास्टर आॅफ सायन्स
1923 मध्ये डाॅक्टर आॅफ सायन्स
मृत्यु:6 डिसेंबर 1956
जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, तत्त्वज्ञ, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचे कैवारी, भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री, आणि स्वातंत्र भारताचे जनक होते. याशिवाय बहुआयामी असलेले डॉ. आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, बॅरिस्टर, जलतज्ज्ञ, कृषितज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, अस्पृश्य, कामगार व स्त्रियांच्या अधिकारांचे पुरस्कर्ते होते.
 *कोणी आणि कशी सुरू केली भीम जयंती*  
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १२९ वी जयंती साजरी केली जात आहे. 
पहिली आंबेडकर जयंती 1928 साली जनार्दन सदाशिव रणपिसे या सामाजिक कार्यकत्याने पुणे येथे साजरी केली. 
 त्यावेळेस बाबासाहेबांच्या प्रतिमेची रथातून आणि उंटावरून मिरवणूक काढण्यात आली होती. यामुळे समाजात शोषित घटकांना अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्याची, एकत्र ये ऊन संघटीत होण्याची प्रेरणा मिळाली. हळूहळू भीम जयंतीचा सोहळा गावातून सुरू होऊन शहरात आणि आज परदेशात पोहचला आहे.2017 सालापासून महाराष्ट्रामध्ये 14 एप्रिल हा दिवस ‘ज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
लंडनमधील सन्मान
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलीटिकल सायन्समध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा स्थापला गेला आहे. आणि त्याठिकाणी पुतळा असणारे ते प्रथम भारतीय आहेत.
इ.स. २०१४ साली कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात शिकलेल्या एकूण विद्यार्थांमधून पहिल्या १०० बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वात बुद्धिमान विद्यार्थी (फर्स्ट कोलंबियन अहेड ऑफ देअर टाइम) म्हणून घोषित केले आहे.
*लंडनमधील हेन्री रोडवर स्मारक*
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना 1921-22 या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर इथल्या चार मजली इमारतीत राहिले होते. ही इमारत लंडनमधील हेन्री रोडवर आहे. ही इमारत खासगी होती. महाराष्ट्र शासनाने ही इमारत 30 कोटी रुपयांना विकत घेऊन त्या ठिकाणी स्मारक बनवलं. ज्या स्मारकाचे नूतनीकरणाचे काम महाराष्ट्र सरकारने हाती घेतले होते. तेथील स्थानिक प्रशासनाने म्हणजे कॅमडन काउन्सिलने आक्षेप घेतला.
याचाच दुसरा भाग हा होता की, हा भाग निवासी स्वरूपाचा होता म्हणजे तो रेसिडन्स एरिया होता त्यामुळे तेथील लोकांना त्याचा त्रास होत होता. त्यामुळे कॅमडन काउन्सिलने हा वाद न्यायालयात गेला. हा खटला भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने जिंकल्यामुळे आता या स्मारकाच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

No comments:

Post a comment