तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 April 2020

स्वंयम शिक्षण प्रयोग तर्फे करजखेडा गावा मध्ये गरजू कुटुंबांना अन्न धान्याचे किट वाटप.....
आकाश लश्करे
उस्मानाबाद

कोरोना या विषाणजन्य रोगाने संपूर्ण जगात मोठया प्रमाणात धुमाकूळ घातला कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहेत या संचार बंदी मुळे अनेकांचा रोजगार हिस्कावला  गेला आहे. 
स्वंयम शिक्षण प्रयोग संस्थेचा एक मदतीचा हात म्हणून उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा या गावात गरजू व गरीब महिलांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले .
लाॅकडाऊन च्या पाश्र्वभूमीवर गावातील गोरगरीब , गरजू , अपंग , विधवा अश्या 25 महिलांना अन्न धान्याचे किट करजखेडा गावामध्ये तालुका कृषी आधिकारी जाधव सर , सरपंच सुरेखा बनकर ताई ,उपसरपंच सुभाष कळसुले यांच्या हस्ते देण्यात आले. आशा कार्यकरती रूपाली नागटिळे , ग्राम पंचायत सदस्य पांडूरंग गरड , अमृत सुरवसे ,लिंबराज साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. 
स्वंयम शिक्षण प्रयोगच्या संवाद सहाय्यक यांनी गावा मध्ये मास्क वाटप केले जीवनावश्यक वस्तू वाटप करत असताना महिलांना 3 मीटर अंतरावर उभे राहून व सॅनिटायझर चा वापर करून अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले. 
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी स्वंयम शिक्षण प्रयोग जिल्हा समन्वयक बाळासाहेब काळदाते सर तसेच स्वंयम शिक्षण प्रयोग च्या तालुका समन्वयक सुजाता पाटील ,शिला भोजने तसेच करजखेडा गावा मध्ये गावपातळीवर काम करत असलेल्या सुनिता क्षीरसागर यांनी सहकार्य केले .

No comments:

Post a Comment