तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 April 2020

माय,गरीबाची भुक तु भागवलीस,तुले माह्या लेकराकडून लय आशीर्वाद मिळल......गरीबांची भुक भागवणार्‍या ज्योती ठाकरे यांना महिलेकडुन आशीर्वाद

महिला टीम पोहचली दिव्यांगाच्या मदतीसाठी 

वाशिम(फुलचंद भगत)-मदत आणी जी योग्य ठिकाणी झाली की सत्कारणी लागते.असाच एक प्रत्यय मंगरुळपीर येथे एका गरीब कुटुंबाला करतांना आला.समाजसेविका ज्योती ठाकरे या लाॅकडाऊनमध्ये गरीब गरजु,वृध्द,विधवा आदिंना मदत करन्यासाठी आधिपासुनच सरसावल्या.पुढे त्यांच्या मदतीचे कार्य बघुन त्यांच्या महिला सहकारीही सरसावल्या.नंतर या लाॅकडाउनदरम्यान गरजुंना मदत लागल्यास संपर्क करन्याचे आवाहन करताच मदतीसाठी फोन सुरु झाले.ज्यांना मदत हवी ती करन्यासाठी ज्योती ठाकरे आणी त्यांची महिलाटिम अॅक्शनमोडवर आली आणी प्रशासनाची पुर्वपरवानगी घेवुन आणी शासनाचे नियम पाळुन गरीबांच्या झोपड्यामध्ये जावुन त्यांना जिवनावश्यक वस्तुसह किराणा मालही दान देत राहिल्या.मदत करतांना अनेकांनी आभारही मानले,अनेकांनी आपल्या डोळ्यांच्या कडाही ओल्या केल्या.आपले जवळचे कुणी कठीण परिस्थीतीत करणार नाही पण एक परकी महिला आपलेपणाने आणी गरीबांचे दुःख जाणून मदत करतांना पाहुन सर्वबाजुंनी ठाकरे यांचे कौतुक हौवू लागले.मला गरजु गरीबांना त्यांच्या परिस्थीतीची जाण असल्यामुळे मदत करन्यात समाधान वाटते असे त्या म्हणाल्या तसेच दि.२० एप्रिलरोजी पंचशिलनगर येथील काही दिव्यांग आणी गरीब वृध्दांना तातडीची मदत हवी असल्याचे कळतात समाजसेविका ज्योती ठाकरे या आपल्या महिला सहकार्‍यासह तिथे गेल्या आणी त्यांना जिवनावश्यक वस्तु आणी किराणा दिला.हे आपल्यासाठी केलेली मदत बघुन एका वृध्द महिलेने "माय तु आमची भुक भागवलीस,तुला माह्या लेकराकडुन आशीर्वाद मिळल असा आशीर्वाद ठाकरे यांना दिल्यानंतर त्यांच्याही डोळ्यात अश्रु आले.प्रत्येकांनी आपली जबाबदारी समजुन अशावेळी गरजुंना मदत करणे यासाठी भाग्य हवे आणी हे कर्तव्य प्रत्येकांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे पार पाडावे असे ठाकरे आवाहनही करतात.परंतु गरीबांचे दुःख जानणारे समाजात अत्यल्पच दिसत आहेत आणी सर्व असुनही गरीबीची मजा पाहणारेच जास्त आहेत.गरीबांचा आशीर्वादच मला सामाजिक कार्य करन्याची नवी ऊर्जा देते आणी समाधानही मीळते असे भावनिक मत समाजसेविका ज्योती ठाकरे यांनी मांडले.प्रशासनासोबत आपलीही गरजुंना मदत करन्याची जबाबदारी आहे त्यामुळे प्रत्येकांनी गरीबांना मदत करावी असे आवाहन प्रशासनही करीत आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment