तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 8 April 2020

हाताळा येथील शेतकऱ्यांस विजेचा शॉक लागल्याने दोन पत्रकार आले मदतीला धाऊन

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडेसेनगाव तालुक्यातील हाताळा येथील शेतकऱ्यांना विजेचा जबर शॉक लागला हि  घटना दुपारी दोन वाजता घटली आहे  मात्र सध्या पूर्ण लॉक डाऊन असल्याने वेळेवर गाडी पण मिळली नाही 108 पण गाडी मिळाली नाही शेवटी या शेतकऱ्यांना मोटर सायकल वर जावे लागले पण वाटेतच गाडीचे पेट्रोल पण संपले आणि थेवड्यात मदतीला पत्रकार बालाजी देशमुख धाउन आले
आज दिनांक 8 /4 /2020 रोजी सेनगाव तहसील तेथून परत येताना  हाताळा फाटा याठिकाणी शेतकरी रामकिसन घाटूळकर
या शेतकऱ्यास लाईटचा शॉट लागल्यामुळे त्यांच्यासोबत दोन महिला व एक पुरुष असे हाताळा फाट्यावर बसले होते मोटर सायकल मध्ये पेट्रोल संपले होते त्याना दवाखान्यात जाण्यासाठी वाहन नव्हते त्यातच पत्रकार बालाजी देशमुख यांनी त्यांना विचारले असता दादा माझ्या नवऱ्याला लाईटचा शॉट लागला आहे आम्हाला  गोरेगाव दवाखान्यामध्ये  जायचे आहे  बालाजी देशमुख यांनी 108  क्रमांकवर   फोन लावला असता  सेनगाव  गोरेगाव साखरा  भांडेगाव यापैकी कोणत्या ठिकाणावर  ॲम्बुलन्स उपलब्ध नव्हत्या  त्यावेळी  बेशुद्ध अवस्थेमध्ये असलेल्या शेतकऱ्याला दवाखान्यामध्ये जायचे आहे आमच्या गावा मध्ये फोन केला असता एक सुद्धा गाडी नाही अशातच पळशी कडून गोरेगावला जाणारे पिकप वाहन आडगाव येथील होते त्या गाडीच्या आडवे उभे राहून संबंधित शेतकऱ्याला गाडी मध्ये टाकून तात्काळ गोरेगाव येथील सामान्य रुग्णालय याठिकाणी ऍडमिट केले त्यानंतर गोरेगाव येथून शेतकऱ्याला हिंगोली येथील सामान्य रुग्णालयात रेफर केले आहे अशाप्रकारे पत्रकार हे सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून येणारा एक दुवा आहे संबधित महिलांनी पत्रकार बांधवांचे आभार मानले दादा तुम्ही नसता तर आम्ही दवाखान्यापर्यंत पोहोचलोच नसतो तुम्ही देवासारखे धावून आले पत्रकार हा खरोखरच देव रुपी  माणूस असतो असे प्रत्यक्षात हाताळा येथील माता-भगिनी यांनी आज प्रत्यक्षात पाहिलेतेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a Comment