तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

स्वाराती” रुग्णालयातील ७० परिचारीकांना हवी कोविड १९ पासुन संरक्षण करणारी सामुग्री


कोविड१९ च्या विषाणुचा प्रादुर्भाव रोखणारे एन९५ माक्स, पीपीई कीटस्, एचआयव्ही किटस्, सँनिटायझर, हायपोक्लोराइडसह आदींची मागणी

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- कोरोना रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरत चालला असल्यामुळे या रोगाची धास्ती सर्वच क्षेत्रात घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या रोगाचा लढा देण्यास सज्ज असलेल्या पररिचारीकांना अत्यावश्यक खसलेली सर्व साधने उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात अधिसेविकेकडे ७० परिचारीकांच्या स्वाक्षरीचे एक निवेदन देण्यात आले असूध या निवेदनात वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्य रुग्ण विभाग, अतिदक्षाता विभाग, बालरोग अतिदक्षता विभाग, कोरोना च्या पार्श्वभूमीवर निर्माण करण्यात आलेल्या स्वतंत्र विभागात काम करणाऱ्या परिचारीकांना कोविड१९ च्या विषाणुचा प्रादुर्भाव रोखणारे एन९५ माक्स, पीपीई कीटस्, एचआयव्ही किटस्, सँनिटायझर, हायपोक्लोराइड आणि इतर साहित्याचा मुबलक प्रमाणात पुरवठा करण्यात यावा आशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनात औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात बाह्य रुग्णविभागात काम करणाऱ्या एका परीचारकास कोरोनाची लागन झाल्याची बातमी आल्या नंतर येथील सर्व परिचिरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाली असून त्यांच्या मनात निर्माण झालेली ही भिती वस्तुस्थिती दर्शक असुन सध्या परिचारीका या सामुग्री न पुरवता काम करण्यास सांगितले जात असून हे अन्यायकारक असून कुटुंबियांवर ही अन्याय करणारे आहे. त्यामुळे आपण शासन पातळीवर पाठपुरावा करुन लवकरात लवकर ही सामुग्री उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे
.
या निवेदनात रुग्णालयात कोरोना बाधित व संशयित रुग्णासाठी निर्माण करण्यात आलेल्या कक्षामध्ये सर्व परिचारीकांची रोटेशन प्रमाणे “समान काम समान संधी” या तत्वानुसार नियुक्ती करण्यात यावी. तसेच सतत काम करणाऱ्या कर्मचा-यांना क्वारंटाइनची ही सुविधा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात काम करणाऱ्या ६९ परिचारीका व एक परीचारक अशा एकुण ७० जणांच्या स्वाक्ष-या आहेत.

No comments:

Post a Comment