तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 27 April 2020

संत गाडगे महाराज सेवाभावी संस्थेच्या वतीने विधवा व परित्यक्ता महिलांना अन्नधान्य वाटप                     परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था,लिंबुटा या संस्थेच्या वतीने तालुक्यातील टोकवाडी  येथील  विटभट्टी कामगार  विधवा व परित्यक्ता महिलांना अक्षय तृतीयचे निमित्त साधुन  रविवार, दि.२६ एप्रिल रोजी सकाळी ९.०० वा.अनुलोमचे परळी भाग जनसेवक दयाराम अघाव  व संस्थेचे सचिव अशोक लिंबाजी मुंडे यांच्या हस्ते मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले.
   देशभरात  कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन सुरू आहे.राज्यातही वेगळी परिस्थिती नाही.त्यामुळे अनेक उद्योग व्यवसाय ठप्प झालेले आहेत.विटभट्टी व्यवसायही याला अपवाद नाही.या व्यवसायावरच  आपली ऊपजिविका भागवणाय्रा मजुरांवर ऊपासमारीची वेळ आली आहे.त्यातलेत्यात कुटुंब प्रमुख म्हणून  जबाबदारी पारपाडत असलेल्या विधवा व परित्यक्ता महिलांना थोडातरी आधार मिळावा,या उद्देशाने संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था,लिंबुटा ता.परळी जि.बीड या संस्थेच्या वतीने पाच महिलांना प्रत्येकी दोन कि.ग्रा. गहू व तीन कि.ग्रा.तांदूळ या प्रमाणे प्रत्येकी पाच कि.ग्रा. धान्य मोफत  वाटप करण्यात आले.

No comments:

Post a comment