तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 12 April 2020

धान्य वाटपात अफरातफर करणाऱ्या रेशन दुकानदारांवर कडक कारवाई करावी- प्रा.विजय मुंडे


महसूल प्रशासनाने लक्ष घालून कारवाई करण्याची गरज

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकार विविध उपाययोजना करीत आहेत. सामान्य नागरिकांच्या हाताला कामधंदा नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे त्यांची उपासमार थांबवण्यासाठी प्रत्येक महिन्याला सार्वजनिक वितरण प्रणाली द्वारे शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करण्याची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आली असून त्यामध्ये काही दुकानदार अफरातफर करीत आहेत अशा दुकानदारावर महसूल प्रशासनाच्या तहसीलदार,  नायब तहसीलदार  व इतर अधिकाऱ्यांनी तात्काळ कडक कार्यवाही करावी अशी मागणी परळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा. विजय मुंडे यांनी केली आहे.


   केंद्र सरकार व राज्य सरकारने सध्या 30 एप्रिल पर्यंत संचारबंदी व जमावबंदीचा आदेश देण्यात आले आहेत याच काळात ज्या सामान्य नागरिकांचे पोट हातावर आहे त्यांना कसलाही काम धंदा नाही असे सर्व शिधापत्रिकाधारक यांना रेशन दुकानदारांकडून धान्य वाटपाची व्यवस्था सरकार कडून करण्यात आलेली आहे त्यामध्ये कुटुंबातील शिधापत्रिकाधारक व्यक्तींना तांदूळ व गहू देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे परंतु काही रेशन दुकानदार याचा गैरफायदा घेऊन धान्य वाटपात अफरातफर करीत आहेत  बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश संबंधित रेशन दुकानदारांना दिलेले असतानाही रेशन दुकानदार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता सामान्य नागरिकांना व शिधापत्रिकाधारक व्यक्तींना रेशन मालाची पावती देण्यास टाळाटाळ करीत आहे असे निदर्शनास आले आहे त्याचाच एक भाग म्हणून परळी शहरातील साठे नगर येथील रेशन दुकानदाराने धान्य मालाच्या किमतीची पावती देण्यास टाळाटाळ केल्याचेहीेे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा दुकानदारांवर महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करणे गरजेचे आहे.


    दरम्यान केंद्र व राज्य सरकारची प्राथमिकता  सध्या कोणताही सामान्य नागरिक उपवास पोटी झोपू नये त्याची उपासमार थांबावी ही आहे त्यामुळेच स्वस्त धान्य दुकानावर केंद्र सरकार तर्फे प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना मोफत प्रति व्यक्ती पाच  किलो प्रमाणे तांदूळ आणि दोन रुपये किलोप्रमाणे गहू व तीन रुपये प्रति किलो प्रमाणे तांदूळ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच ज्या शिधापत्रिकाधारकांनी  आपले आधार कार्ड  ऑनलाइन केले नसेल  त्यांनी  आपले आधार कार्ड  संबंधित  स्वस्त धान्य दुकानात दुकानदाराकडून ऑनलाइन करून  आपल्या हक्काचे धान्य संबंधित स्वस्त धान्य दुकानातून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. प्रशासनाने सुद्धा यामध्ये लक्ष घातले आहे परंतु काही दुकानदार मात्र याच संधीचा फायदा घेऊन धान्य वाटपात अफरातफर करीत आहेत. शिधापत्रिकाधारकांना पावती देत नाहीत म्हणून अशा स्वस्त धान्य दुकानदारांवर महसूल व अन्नधान्य  प्रशासनाने लक्ष घालून कडक कारवाई करावी अशी मागणी प्रा. विजय मुंडे यांनी केली आहे.

No comments:

Post a comment