तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 April 2020

परळीत गाय चोरून नेताना नागरीकांनी दोघांना रंगे हात पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.२५- गाय चोरून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार परळीत समोर आला आहे.मात्र ही बाब काही जणांच्या लक्षात येताच त्यांनी थेट या आरोपींना पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.शहरातील अमर मैदानात झालेल्या या प्रकाराने सर्वत्र फिरणाऱ्या जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.दरम्यान ही बाब शिवसेना तालुका प्रमुख वेंकटेश शिंदे यांना समजताच ते पोलीस ठाण्यात दाखल झाले व या प्रकरणात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

लॉक डाऊन च्या काळात असलेल्या संचारबंदीत परळीत गाय चोरत असलेल्या दोघांना आज रंगेहात पकडले आहे.शहरात असलेल्या अमर मैदानावर असलेल्या गाईच्या (वय-७ वर्षे,अंदाजे किंमत २००००) गळयात दावे टाकून नेत असताना बाबू मनोहर वाघमारे रा.गंगासागर नगर परळी व शेख अख्तर शेख युनूस या दोन्ही आरोपींना पकडले.त्याना या बाबत माहिती विचारली असता त्यानी दावे टाकलेली गाय त्यांची नसल्याचे समजताच याबाबत पोलीसांना कळविले.या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अविनाश पंडित यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुरन १३६/२०२० कलम ३७९,३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली लांडगे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

No comments:

Post a comment