तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटाईजर,मास्कचा साठा जप्त


अंबाजोगाईचे तहसीलदार संतोष रूईकर यांची कारवाई

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सॅनिटाईजरचा कृत्रिम तुटवडा जाणवत असून कोणत्याही औषधी दुकानावर सॅनिटाईजर,मास्क उपलब्ध होत नसल्याने आज दि ७एप्रिल मंगळवार रोजी अंबाजोगाईचे तहसीलदार संतोष रुईकर यांनी अचानक शहरात विविध ठिकाणी औषध दुकान आणि ठोक औषध विक्रेते यांची झाडाझडती घेतली यामध्ये सॅनिटाईजर आणि मास्कचा मोठा साठा पकडला असून तो जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई तहसीलदार संतोष रुईकर, लिपिक प्रकाश गोपड,वाशीम शेख,तलाठी ,मंडळ अधिकारी यांनी केली.
अंबाजोगाई शहरातील विविध ठिकाणच्या ५२ मध्यम ठोक औषध विक्रेत्यांच्या मारलेल्या धाडीत सॅनिटाईजर १००मि.लीचे ३७०, ५००मी.लीचे १५२तर ५लिटरचे ५ कॅन्ड आणि ५३०मास्कचा साठा जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याची माहिती अंबाजोगाईचे तहसीलदार संतोष रुईकर यांनी गाव माझा न्यूजशी बोलताना सांगितले.या कारवाईने अंबाजोगाई शहरातील ठोक आणि किरकोळ औषध विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत

No comments:

Post a Comment