तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 13 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वरूप सामाजिक फौंडेशन व सोनगाव धानोरे ग्रामपंचायतच्या वतीने प्रवरा रुग्णालयात रक्तदान
सात्रळ (प्रतिनिधी)
बाबासाहेब वाघचौरे

 – देशात व राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असून त्यावर उपाय म्हणून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे .राज्यात विविध सरकारी तसेच खाजगी रुग्णालयात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रामाणात जाणवत आहे. म्हणून अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सोनगावचे उपसरपंच किरण पाटील अंत्रे यांच्या संकल्पनेतून स्वरूप सामाजिक फौंडेशन व सोनगाव व धानोरे ग्रामपंचायत च्या संयुक्त विद्यमाने प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान घेण्यात आले.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या नियमात सोशल डिस्टंन्स राखत अनेक तरुणांनी टप्या  टप्याने येऊन रक्तदानाचा अधिकार बजावला अशी माहिती उपसरपंच किरण पाटील अंत्रे  यांनी दिली.यावेळी बोलताना श्री अंत्रे म्हणाले की,जेव्हापासून संचारबंदी लागू झाली तेव्हा पासून आम्ही ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी गावातील ग्रामस्थांना येणाऱ्या अडी-अडचणी समजून घेऊन त्या प्रमाणे उपाययोजना करत आहोत.ग्रामपंचायत च्या माध्यमातून व माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा कारखान्यामार्फत उपलब्ध करून दिलेल्या औषधातून दोन वेळेस जंतुनाशक फवारणी केली.बाजारपेठेतील रस्ते बंद करून गर्दी कमी केली तसेच अत्यावशक सेवा देणारे भाजीपाला व किराणा दुकानात गर्दी होऊ नये प्रत्येकात सोशल डिस्टंन्स यासाठी उपाययोजना करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी रक्तदान शिबिरात सुजयपर्व सोशल मिडिया सेलचे व सामाजिक कार्यकर्ते मा.रविंद्र दिघे,महेश दिघे,शेखर दिघे,विजय कोरडे,अभिजित कुलकर्णी सुहास अंत्रे,अक्षय शिंदे, संतोष गाडेकर ,विक्रम अनाप,दत्तात्रय अंत्रे शहाजी दिघे वैभव दिघे तरुणानी रक्तदान केले तर प्रवरा रक्तपेढीचे श्री भोकनळ सर व श्री वर्पे सर याचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a comment