तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

घराघरात स्कीप कोरोना ऊपक्रम राबवा-सागर गुल्हाने


मंगरुळपीर(फुलचंद भगत)-लॉकडाऊनमुले कुठल्याही प्रकारचा व्यायाम हालचाली व्यायामशाळा अथवा क्रीडांगणवर जाऊन करता येणार नाही त्यामुळे घर बसल्या व्यायाम करता यावा या साठी क्रिडा व युवक मंत्रालयानी स्कीप कोरोना हा उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येकाने आपले शरीर  निरोगी आनंदायी राहावे या साठी दोरीवच्या उड्या म्हणजेच स्किप कोरोना हा उपक्रम आपापल्या घरात करावा असा संदेश केंद्रीय क्रिडा व युवक मंञालयाने दिला असल्याची माहिती सागर गुल्हाने शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य यांनी दिली आहे.
           दोरी वरच्या उड्या एक उत्तम व्यायाम प्रकार आहे तो लहानपणी  प्रत्येकाने केलेला असतो मोठे झाल्यावर ही या व्यायामला एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी व कोरोना सारख्या आजारात आपण आपले कुटूंब सुरक्षित ठेवण्यासाठी घरी दररोज दोरी वरच्या उड्या मारणे खुप आनंदायी ठरु शकते. दोरीवरच्या उड्या मारल्याने वजन कमी होण्यासही मदत होते आरोग्य राखण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दोरी वरच्या उड्या हा उत्तम व्यायाम प्रकार आहे.
उंची वाढवाची असेल शरीलाला वळणदार बनवाचे असेल वजन कमी करायचे असेल आपले शरीर  चंचल व फिट राहण्यासाठी दोरी वरच्या उड्या अतिशय चांगला व्यायाम आहे. दोरीवरच्या उड्या मारताना जास्त व्यायाम होतो तो म्हणजे पोटाच्या स्नायुच्या व्यायाम होतो दोरी वरच्या उड्या मध्ये पोटरी आणि पायाच्या पुढच्या बाजूचे स्नायु बळकट  होण्यास  मदत होते असा  सुटीचा सदूपयोग
संकल्प करूया स्किप करूया असे आवाहन सागर गुल्हाने
शिव छत्रपती क्रिडा  पुरस्कार प्रात महाराष्ट्र शासन यांनी केले आहे.


हे नियम पाळावेत

दोरीवरच्या उड्या मारण्यापूर्वी वॉर्मअप करणे आवश्यक आहे वॉर्मअप केल्याशिवाय उड्या मारल्यात तर शरीर दुखू शकते आधी हळूहळू उड्या मारा सवय झाल्या नंतर वेग वाढवावा उड्या मारल्या नंतर पाच मिनिट अराम करावा अथवा शवासनात पडून रहा.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

1 comment: