तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 April 2020

अन्न धान्याची जमवा जमव, गरजू व गरीब कुटुंबाना वाटपलातूर (प्रतिनिधी)


कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगावर, देशावर, महाराष्ट्रात टप्या-टप्याने वाढत वाढत मोठ्या प्रमाणात वाढले. महाराष्ट्र विभागात मोठ-मोठ्या शहरात कोरोना चे रुग्ण मिळू लागले. टिव्ही वर बातम्या कोरोना संधर्भात येऊ लागल्या त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या मनावर तन-तणाव वाढायला लागला. महाराष्ट्र शासनाने एक दिवस लॉक डाउन जाहीर केले त्यानंतर लगेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेबांनी २१ दिवसाचे लॉकडाउन जाहीर केले तेंव्हा गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे, विभागाचे राजधानीचे सर्व रस्ते वाहतूक बंद झाली. लॉकडाउन मध्ये जेथे आहात तेथेच घरात राहा म्हणून सांगितले गेले. तरीपण खेड्यातून-शहरात नोकरीच्या निमित्ताने गेलेल्या माणसाचा लोंढा गावाच्या दिशेने येऊ लागला. त्यावेळेस महिलांच्या मनात एक भीतीचे वातावरण तयार झाले होते ते म्हणजे शहरातील माणसा सोबत कोरोना गावात येईल व गावातील माणसांना कोरोना ग्रस्त करून टाकेल या भीतीने महिला ग्रस्त झाल्या होत्या.
समदर्गा, तालुका औसा या खेडेगावात शहरातून मुंबई व पुणे येथून ८४ माणसे गावाकडे आपले गबाळ घेऊन परत आले आहेत. त्यांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था त्यांच्या नातलगाकडून करण्यात आली आहे. गावात गल्ली-गल्लीत, चौका-चौकात कोरोना महामारी संदर्भात चर्चा व गप्पा लहान मुला पासून ते वृद्ध मंडळी पर्यंत होत होती. तेंव्हा तालुका ट्रेनर कौशल्य मंदाडे यांचा फोन संवाद सहाय्यकाला आला व त्यांनी संवाद सहाय्यकाला सांगितले कि आपल्या गावातील शेतकरी महिलांना सखी अन्न सुरक्षा शेती सोबत आता कोरोना विषाणू साथ आजारावर माहिती/प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. प्रथम संवाद सहाय्यकाला फोन वरून माहिती व प्रशिक्षण दिले. तसेच गावातून जनजागृती करत असताना धान्य/कडधान्य, तांदूळ व डाळी या स्वरूपातून मदत करण्यासाठी गावातील महिलांना माहिती देण्या विषयी तालुका ट्रेनर यांनी कल्पना सुचवली होती.
अशा परिस्थिती मध्ये कोरोना विषाणू साथ आजार, कोरोना काय आहे, कोरोना विषाणू दोन प्रकारे पसरतो, कोरोना आजाराची धोकादायक लक्षणे, कोरोना आजाराचा जास्त धोका कोणाला, कोरोना आजार टाळण्यासाठी, कोरोना बाबत गैरसमज कोरोना आजाराची शंका आल्यास, कोरोना विषाणू साथ हि एक आपत्ती आहे. या विषयावर गावातील मुले, मुली, महिला, पुरुष, वृद्ध मंडळी यांची जनजागृती गाव पातळीवरील संवाद सहाय्यक, ६ चॅम्पियन, ६ सखी कृषी गटाचे अध्यक्ष, सचिव यांच्या मार्फत केली गेली या सर्व लिडर महिलांना प्रथम संवाद साय्यक यांनी प्रशिक्षण देऊन सक्षम केले, त्यावेळेस त्यांनी गावातील सखी अन्न सुरक्षा शेती प्रकल्पात काम करत असलेल्या ६० अल्पभूधारक शेतकरी महिलांना पैशा ऐवजी ज्वारी, गहू, तांदूळ, तुरडाळ, मुगडाळ, हरभराडाळ आपण संवाद सहाय्यक यांच्या घरी ११ एप्रिल २०२० ते १५ एप्रिल २०२० या कालावधी मध्ये ज्या कुटुंबाला जेवढे देणे शक्य आहे तेवढे धान्य, कडधान्य, डाळी जमा करावे व ते जमा झालेले धान्य, कडधान्य, डाळी “हातावर पोट असलेल्या ४१ कुटुंबाला वाटप करणार आहोत” कारण ह्या लॉकडाउन च्या काळात त्यांना काम मिळत नाही त्यामुळे त्यांच्या दररोजच्या खाण्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. आपण सखी अन्न सुरक्षा शेती मध्ये आपण एका विचाराने काम करतो. सामाजिक बांधिलकी म्हणून आपणास हे काम कार्याचे आहे. समाजाचे काहीतरी देणे आहे व ते या स्वरुपात द्यायचे आहे.
११ एप्रिल २०२० ते १५ एप्रिल २०२० या कालावधी मध्ये ज्वारी १०५ किलो, गहू ८५ किलो, तांदूळ ९४ किलो, तुरडाळ ५० किलो, हरभराडाळ ४६ किलो, मुगडाळ ३२ किलो एकूण अन्नधान्य ४१२ किलो जमा झाले होते ते धान्य, कडधान्य, डाळीदररोजच्या दररोज एकूण ४१ हातावर पोट असलेल्या गरीब व गरजू कुटुंबाला वाटप केले.
या वाटपाच्या कार्यक्रमास गावचे सरपंच व दक्षता समिती अध्यक्ष संजय ढोक, औसा तालुका ट्रेनर कौशल्य मंदाडे, संवाद सहाय्यक विजया गोविंद गवळी, जागृती सखी गटाच्या अध्यक्षा मनीषा गायकवाड, सचिव संगीता तिडके, क्रांती सखी कृषी गटाच्या अध्यक्षा सीमा तिडके, सचिव सारिखा गरगडे, प्रगती सखी कृषी गटाच्या अध्यक्षा अशा तिडके, सचिव अनिता महाडिक, ६ चॅम्पियन डेमो फार्मर सखुबाई काळे, इव्लाबाई ढोक यांच्या उपस्थिती हा वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

No comments:

Post a comment