तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 12 April 2020

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान बस नाम ही काफी है.....!ज्या मुंडे साहेबांनी आपले आयुष्य गोरगरिबांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, भरभराटीसाठी घातले तो कर्म योद्धा लोकनेता स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्वर्गवासा नंतर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत  त्या कष्टकरी,गोरगरीब, दिंनदुबळ्यांसाठी सतत काम करणाऱ्या लोकनेत्या माजी मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नाही तर देशभरात काम करणारी संस्था म्हणजे "गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान" होय...
       सर्वसामान्य माणूस मग तो कोणताही,कुठलाही असेल त्यांच्या संकटात "गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान" ही संस्था सातत्याने उभी राहिलेली दिसते, ऊसतोड कामगारांचा प्रश्न असेल त्यांच्या हुशार-होतकरू गरजुवंत  पाल्यांचा शिक्षणाचा विषय असेल गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाण हे त्यांच्या मदतीला नेहमीच धावून आलेले आहे,राज्य भरात संकट समई अनेक गोरगरीब-कष्टकरी जनतेच्या सुख दुःखात अग्रगण्याने सहभाग नोंदवणारी संस्था म्हणून या संस्थेकडे पूर्ण महाराष्ट्र मोठ्या आशेने पहात आहे,त्याच बरोबर सर्वं सामान्य व्यक्तीला असाध्य आजार झाला किंवा एखादे अपेक्षेपेक्षा जास्त खर्च असणारे ऑपरेशन(सर्जरी)करायची वेळ आली तर अशा अनेक गरीब लोकांच्या दवाखान्याचा खर्च सुद्धा या प्रतिष्ठाण च्या माध्यमातून होत असतो दरवर्षी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या  जयंती व पुण्यतिथी निमित्त अनेक समाजोपयोगी उपक्रम या या प्रतिष्ठाण च्या माध्यमातून राबविले जातात या मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात दखल घेण्यात आली असे ऐतिहासिक महाआरोग्य शिबीर या प्रतिष्ठाण च्या माध्यमातून राबविण्यात आले या मध्ये लाखों लोकांच्या विविध आरोग्य विषयक तपासण्या बरोबर सामान्य जनतेच्या ऐपत क्षमतेच्या बाहेरची अत्यंत खर्चिक अशा कॅन्सर सारख्या विविध आजारावर च्या शस्त्रक्रिया हजारोंच्या संख्येने केल्या.परळीत घेतलेला भव्य दिव्य असा ऐतिहासिक सामुदायिक विवाह सोहळा अशा उपक्रमा बरोबरच अपंगांना सायकल,बाजारात बसणाऱ्या व्यापाऱ्यांना छत्र्या,सामान्य कुटुंबातील मुलांची शालेय फीस,मेडिकल किंवा अभियांत्रिकी ला नंबर लागलेल्या सामान्य कुटुंबातील मुलांना आर्थिक मदत, विविध ठिकाणी नैसर्गिक आपत्ती प्रसंगी म्हणजे कुठे वीज पडून नुकसान झाले असेल कुठे आग लागली असेल,कुठे अपघात झाला असेल अशा कठीण प्रसंगीं पीडित कुटुंबातील लोकांना "गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाण" ने नेहमीच मदतीचा हाथ दिला आहे हे महाराष्ट्र कदापिही विसरणार नाही.
         "कोरोना" covid-19 या जीवघेण्या आजाराची साथ महाराष्ट्रा बरोबर संपुर्ण देशभरात  पसरलेली असतांना या कठीण प्रसंगी सुद्धा "गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाण" सर्व सामान्य लोकांच्या मदतीला नेहमी प्रमाणे धाऊन आले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केलेल्या विनंती ला प्रतिसाद देत "पंतप्रधान रिलिफ फंड भारत सरकार" यांना प्रतिष्ठाण ने 25 लाख रुपयांची देणगी तर दिलीच मात्र परळी शहरात हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेसाठी प्रतिष्ठाण च्या माध्यमातून 5000 लोकांना शिधा वाटप करण्यात येत आहे,कोरोना च्या प्रादुर्भाव थांबवण्या साठी  गेल्या 25 मार्च पासून पूर्ण देश लॉकडाऊन आहे या मुळे रोजगार बंद पडल्यामुळे अनेक रोजंदारी कामगार,सर्वसामान्य व्यापारी,मजुरवर्ग हे अत्यंत अडचणीत सापडलेले आहेत म्हणूनच गरजूंना एक हाथ मदतीचा या नात्याने प्रतिष्ठाण च्या वतीने हा शिधा वाटण्याचा सामाजिक बांधिलकी जपणारा
उपक्रम प्रतिष्ठाण कडून राबविण्यात येत आहे,शहरातील प्रत्येक ठिकाणी प्रतिष्ठाण चे कार्यकर्ते गोरगरीब गरजूंना शिधा वाटप करण्याचे काम करत आहेत या मध्ये गरजूंना  जीवनावश्यक वस्तूंचे किट ज्यात गव्हाचे पीठ, तांदूळ, तुर दाळ, साखर, गोडतेल, चना, मीठ पुडा, मिरची व हळद पावडर, साबण आदी साहित्य वाटप करत आहेत या मुळे सामान्य लोकांना या कठीण प्रसंगी थोडा का होईना आधार पोचत असून जनतेकडून "गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाण" चे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत सर्वसामान्य, दिंनदुबळ्यांसाठी,कचलेल्या-पिचलेल्या, सामान्य लोकांना एक कठीण प्रसंगी एक हक्काचे व्यासपीठ म्हणून प्रतिष्ठाण समोर आले आहे म्हणून आता कोणत्याही संकट समई एवढेच म्हणावे वाटते की "गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाण" बस नाम ही काफी है.....!!
प्रा पवन मुंडे
नगरसेवक
नगरपरिषद,
परळी वैजनाथ

No comments:

Post a comment