तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

उटी ब्रम्हचारी अंगीकृत कलेचा वापर करून गावभर रेखाटली कोरोना जनजागृतीची चित्रे
साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

गावचा कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलीस पाटील दांपत्याचा सोशल फंडा*


सेनगाव तालुक्यातील उटी ब्रम्हचारी येथे गावचा कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडणाऱ्या वर्षा साळवे व पंजाब साळवे पोलीस पाटील दांपत्याने अंगीकृत असलेल्या कलेचा वापर करून कोरोणावर उपाय म्हणून सोशल फंडा अवलंबला आहे,  कोरोणासोबत दोन हात करण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातायत, याच पाठोपाठ आता हिंगोली सेनगाव तालुक्यातील उटी ब्रह्मचारी येथील  पोलीस पाटील दाम्पत्य आता कोरोणासोबत दोन हात करू लागल आहे. पोलीस पाटील पंजाब साळवे व त्यांची पत्नी वर्षा साळवे या दोघांनी स्वखर्चातून गावातील भिंतीवर तैल चित्राच्या सहाय्याने चित्रांचे रेखाटन केले आहे. या चित्रांमधून विविध प्रकारचे संदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता या नियमाचे पालन गावकरी देखील काटेकोरपणे करू लागले आहेत.

प्रतिकिया 
सध्या पूर्ण देशावर कोरोनाचे संकट उभे यावर आम्ही आमच्या उटी ब्रम्हचारी गावात कोरोना वर जनजागृती वर सुमारे 100 च्या वर चित्रे स्वता काढून पूर्ण गावात जनजागृती करत आहोत आणि आम्ही आमच्या स्व खर्चाने हि जनजागृती करत आहेत 

वर्षा पंजाब साळवे पोलिस पाटील उटी ब्रम्हचारी 
तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment