तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 April 2020

बीड जिल्ह्यातील शाळांमध्ये महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण न करण्याचे आदेश


बीड (प्रतिनिधी) :-  दि.23 कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून  दि.1 मे 2020 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त  कोणत्याही शाळेत ध्वजारोहण करु नये असे आदेश जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अजय बहिर यांनी दिले आहेत. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना पाठवले आहेत. 

बीडचे शिक्षणाधिकारी अजय बहिर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की,  कोरोना (कोवीड 19) चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता म्हणुन दिनांक 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र दिनी कोणत्याही शाळेत ध्वजारोहण करण्यात
येऊ नये. या बाबत आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व मुख्याध्यापक यांना कळविण्यात यावे असे पत्र त्यांनी गटशिक्षणाधिकारी यांना पाठविले आहे. त्याचबरोबर दि. 1 मे 2020 नंतर शाळांना सुटटया असल्या तरीही कोवीड -19 प्रादुर्भाव टाळण्यास जिल्हाधिकारी यांनी सुचना दिल्याप्रमाणे कोणत्याही शिक्षकांनी मुख्यालय सोडु नये, या बाबत आपल्या स्तरावरुन सुचना देण्यात याव्यात. तरी आपल्या तालुक्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक /माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना उपरोक्त आदेशा प्रमाणे योग्य त्या सुचना द्याव्यात असेही शिक्षणाधिकारी बहिर यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a comment