तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 April 2020

ज्या कारंजा मध्ये पञकारांनी कर्तव्यावरीला पोलिसांना पाणी पाजले,तिथेच पञकाराला अमानुष मारहाण


पञकारांनी पोलिसांसाठी राबवलेल्या सेवाभावी ऊपक्रमाचे हेच का फळ?

अहो साहेब,सामाजीक भावनेची जाण तर ठेवा

वाशिम(फुलचंद भगत)-संपुर्ण देशात कोरोनाच्या प्रकोपामुळे संचारबंदी लागु केली गेली.या संचारबंदीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर पोलिस बांधव ऊन्हातान्हात कर्तव्य बजावत आहेत तर रुग्नाची सेवा करन्याचे कर्तव्य डाॅक्टर आणी आरोग्य यंञना पार पाडत आहेत.पोलीस आणी आरोग्यविभागांच्या या सेवेबद्दल अनेकांनी सहानुभुतीही दर्शवली तर काहींनी या दोन विभागाच्या  पगारात कपात करु नका अशी विनंतीही शासनाला केली एवढी जनता या दोन विभागावर भारावुन गेली.याच जाणीवेने वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील पञकारांनी मिळुन एक सेवाभावी ऊपक्रम राबवायचे ठरवले.जे पोलिस बांधव ऊन्हातान्हात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावत आहेत त्यांना थंडगार आणी शुध्द पाणी पाजायचा ऊपक्रम सुरु केला.सर्व पञकार मिळुन आपली पदरमोड करुन पैसे गोळा केले आणी त्या पैशातुन कर्तव्यावर ऊन्हातान्हात ऊभ्या असलेल्या पोलिसदादांना थंडगार पान्याची व्यवस्था करणे सुरु केले.लाॅकडाऊनपर्यत हा सेवाभावी ऊपक्रम राबवायचे ठरवले या ऊपक्रमामध्ये साप्ताहिक कारंजा महादलच्या टिमने पुढाकार घेवुन ही व्यवस्था केली खरी पण मध्येच माशी शिंकली....ज्या कारंज्यामध्ये पञकारांनी कर्तव्यावरील पोलिसांना थंडगार पाणी पाजले तिथल्याच जेष्ठ पञकार सुधिर देशपांडे यांना पोलिसांकडुनच अमानुषपणे मारहान करन्याचा निंदनिय प्रकार घडला.देशपांडे हे सकाळी अकराच्या सुमारास आपल्या शेतात शेतीच्या कामानिमित्य जात असतांना काही पोलिसांनी अडवुन त्यांना अमानुष मारहान केल्याचे कळले व गाडीत बसवुन पोलिस स्टेशनलाही आनले.हा नेमका काय प्रकार काय आहे यासंदर्भात सबंधित वरिष्ठ पोलिस प्रशासन चौकशी करुन दोषींवर कारवाईही जरुर करतील पण,अहो साहेब ज्या पञकारांनी ऊन्हातान्हातल्या पोलिसदादांना पाणी पाजले,त्यांची तहान शमवली त्याच पञकारांना अशी मारहान होणे म्हणजे कुठेतरी मनाला चटका लावुन जान्याचा प्रकार अाहे.कायदेशिर मार्गाने प्रश्न सोडवता आला असता तिथे नाहक मारहान करने म्हणजे काय? असा प्रश्नही आता जनता विचारत आहे.पञकार एकजुट होवुन प्रशासनाला जाब विचारेलच आणी कारवाईही होईल पण सेवाभावी वृत्तीने पञकारांनी राबवलेल्या पोलिसांसाठीच्या ऊपक्रमाचे असे फळ मिळते हे कुठेतरी विचार करायला भाग पाडत आहे.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment