तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 April 2020

प्रा.टी.पी. मुंडे सरांच्या अथक परिश्रमातून संकटकाळी मिळतोय गोरगरिबांना आधार !

----------------------------------------

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

जग आणि देशभरात 'कोव्हिड- 19 ' या विषाणूने सर्वत्र थैमान घातल्याने संपूर्ण जनजीवन भयभीत आणि विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वत्र लॉक डाऊन जाहीर केले आहे ; यात विशेषतः त्यामुळे गोरगरीब अनाथ, भिकारी ,रोजंदारी ,मजूर आदीसह झोपडपट्टीतील हातावर पोट असणार्‍या हजारो गरजूंना उपासमारीला अक्षरश: तोंड द्यावे लागत आहे. हे विदारक स्थिती पाहून प्रा.टि.पी. मुंडे सर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या गरजूंना मानसिक व आर्थिक आधार देऊन मोठे सामाजिक बांधिलकीचे कार्य केल्याचे दिसून येत आहे.

येत्या 3 मे पर्यंत लाँक डाऊन असल्याने आर्थिक दृष्ट्या अनेकांची मोठी कुचंबणा होत आहे. हाताला काम नसल्याने आणि रोगराईची भीती या दुहेरी संकटात सापडलेल्या परळी वैजनाथ तालुक्यातील विविध गाव वाड्या-वस्त्या सह झोपडपट्टीतील गोरगरीब गरजू यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. ही बाब संवेदनशील मनाच्या प्रा.टि.पी. मुंडे सर यांना निश्चितच जाणवल्याचे दिसून येत आहे.

परळी वैजनाथ तालुक्यातील विविध भागात, विविध माध्यमातून सोशल डिस्टन्सिंग पाळत व  कायद्याचे पालन करून त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून योगदान दिले जात आहे. त्यामुळे गोरगरीबांमध्ये एक विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. गोरगरीबांच्या मनाला आधार देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांच्या अडीअडचणी दूर करणे आदीसह त्यांना शासनाच्यावतीने मिळणारे अन्नधान्य, राशन मिळते काय ? या व अशा अनेक प्रश्न व समस्या लक्षात घेऊन त्या सोडविण्यासाठी लॉक डाऊन च्या या संकटकाळात धावून जात काम करणारे प्रा.टि.पी. मुंडे सर यांनी संबंधित घटकांना सूचनाही दिल्या आहेत. या सर्व दृष्टीने यांचे कार्य नक्कीच विश्वासाला पात्र ठरत आहेत.

गेल्या एक महिन्यापासून कोरोना विषाणूने सर्वसामान्य जनता भीतीच्या वातावरणात उपाशीतापाशी जीवन जगत असल्याने एक मोठे सामाजिक संकट ओढवल्याचे चित्र आहे. याचा सर्वाधिक फटका गोरगरिबांना सहन करावा लागतो ,याची सर्वप्रथम जाणीव ठेवून प्रा.टि.पी. सरांनी उपाययोजनांची आखणी केली. अनेक ठिकाणी अत्यंत गरिबीत जीवन जगणाऱ्या पालावरील व झोपडपट्टीतील गरजूंना जीवनावश्यक वस्तू देण्या संदर्भात शहर व गांव पातळीवर राशनदुकानदाराना सुचना करून गोरगरिबांना   आधार देण्याचे काम करतं आहेत.

एकंदरीत, कोरोणा विषाणूच्या या काळात सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, सर्व जनतेला विश्वासात घेऊन सर्वांनी या संकटावर मात करण्यासाठी घरातच राहावे, स्वच्छता बाळगावी असे आवाहन करत आपण सर्वजण भविष्यात यावर नक्की मात करू, असा विश्वासही प्रा.टी.पी. मुंडे सर यांनी आम जनतेला दिला आहे.


प्राचार्य डॉ. बी.डी.मुंडे,
परळी वैजनाथ

No comments:

Post a comment