तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 April 2020

एकटाच गेला अन नवरीला घेऊन आला कोरोनाच्या भीती पोटी फक्त वधू अन वरानीच उरकला स्वतःचा विवाह सोहळा

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाउन करण्यात आलंय. पाच पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी येण्यावर बंधन घातले आहे. त्यामुळे इतर अडचणी बरोबरच लग्नाळूची मोठी पंचायत निर्माण झाली आहे. मात्र यावर पर्याय काढत सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथे केवळ वधू अन वर अन एक जण लग्न लावणारी व्यक्ती आशा केवळ दिघा जनामध्येच घरातच हा विवाह सोहळा उरकला आहे. विशेष म्हणजे  खबरदारी म्हणून नवरी नवरदेवानी मास्क देखील वापरल्याचे पहावयास मिळाले. तर हे नवविवाहित जोडपं दुकीवरूनच। नावरदेवाच्या घरी परतलेय या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची जिल्ह्यात एकच चर्चा होत आहे.बाळू कैलास चाटसे अन अश्विनी लक्ष्मण भुक्तर अशी विवाह बांधनात अडकलेल्या जोडप्याची नावे आहेत.तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment