तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी आवश्यक―प्रा.टी. पी.मुंडेलोकनेते प्रा.टी. पी. मुंडे यांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि...14 एप्रिल कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरामध्ये 3 मे पर्यंत केंद्र सरकारने लॉक डाऊन जाहीर केला असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून सांगितलेल्या नियमांचे प्रत्येक भारतीय नागरिकाने कठोरपणे पालन करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन लोकनेते प्रा. टी.पी. मुंडे सर यांनी केले.


    लोकनेते प्रा. टी.पी. मुंडे सर यांच्या संपर्क कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करून साजरी करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले . यावेळी परळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा. विजय मुंडे , नागापूर जि. प. गटाचे सदस्य प्रदीप भैया मुंडे उपस्थित होते.


   दरम्यान केंद्र सरकारकडून 3 मे पर्यंत संपूर्ण देशात संचार व जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे या नियमांचे सर्व नागरिकांनी कठोरपणे पालन केल्यास कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून आपण निश्चित पणाने सुटू शकतो असा विश्वासही लोकनेते प्रा. टी.पी. मुंडे सर यांनी व्यक्त केला.


   महामानव ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस लोकनेते नेते प्रा. टी.पी. मुंडे सर यांनी शुभेच्छा दिल्या तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या माध्यमातून  कायद्याचे काटेकोरपणे पालन करून व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करणे म्हणजे खर्‍या अर्थाने आपण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरे अभिवादन ठरेल असेही ते म्हणाले.

No comments:

Post a comment