तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 April 2020

रुग्णसेवा युवा ग्रुपच्या वतीने शेलूबाजार परिसरात जीवनाआवश्यक किट चे वाटपाला सुरुवात


संपूर्ण शेलूबाजार परिसरातील खेड्यात अतिशय गरीब कुटूंबाना होणार वाटप

वाशिम(फुलचंद भगत)-राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज व श्री संत गाडगे महाराज यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या ग्राम गोगरी ता.मंगरूळपीर या  भूमीतून, कोरोना मुळे संकटात सापडलेल्या  परिवाराला  रुग्णसेवा युवा ग्रुप विदर्भ यांच्यावतीने मंगरूळपीर चे उपविभागीय अधिकारी देशपांडे व तहसीलदार किशोर बागडे यांच्या शुभहस्ते अतिशय गोरगरीब कुटूंबाना  जीवनाआवश्यक किट वाटपा ची सुरुवात रुग्णसेवा ग्रुप च्या वतीने  केली.सदर किट प्रामुख्याने गावातील  अतिशय गरीब, गरजू अपंग, निराधार बांधवाणा देत आहोत आणि हे जीवनाआवश्यक किट  शेलूबाजार परिसरातील संपूर्ण खेड्यात हा वाटप करण्यात येणार आहे,  आज गोगरी येथे अतिशय गरीब  कुटूंबाना आज  मदत करून कार्याचा शुभारंभ केला.सदर जीवनाआवश्यक किट वाटपावेळी रुग्णसेवा युवा ग्रुप मार्गदर्शक  विनोद जाधव, सरपंच गणेश बोथे, सुरेंद्र  राऊत, शुभम डोफेकर, गोपाल  घुगे, अरुण गंगावने, रुग्णसेवा युवा ग्रुप अध्यक्ष  शिवा सावके उपस्थित होते.सदर जीवनाआवश्यक किट वाटपासाठी सहकार्य करणाऱ्या संपूर्ण विभागातील जिल्ह्यातील दानशूर मंडळी चे आभार रुग्णसेवा युवा ग्रुपच्या वतीने मानले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment