तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

आपत्ती व्यवस्थापनातील अधिकार पवार साहेबांना द्यावेत - पुरुषोत्तम कडलग


सुभाष मुळे..
----------------
नाशिक, दि. ९ _ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देश कोरोणाच्या संकटात सापडलेला असताना केंद्र स्तरावर विशेष समिती स्थापन करून त्या समितीचे सर्व अधिकार आपत्ती व्यवस्थापनात अनुभव असलेले खासदार शरदचंद्र पवार यांना देण्यात यावेत अशी मागणी ईमेल द्वारे केली आहे.
          संपूर्ण जगभरात जशी महामारी पसरली आहे तसेच देशात देखीली महामारी आपले जाळे दिवसेंदिवस विस्तारत आहे आजवरच्या अनुभवाप्रमाणे देशावर आलेले सर्वात मोठी आपत्ती आहे कोरोना रोगावर लवकरात लवकर नियंत्रण आणले नाही तर मोठ्या प्रमाणावर लोक मृत्युमुखी पडतील पण भारत देशाची अर्थव्यवस्था देखील मोठ्या प्रमाणावर ढासळेल तरी आपण भारत देशाचे प्रमुख असल्याकारणाने आपण या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रस्तरावर एक विशेष समिती स्थापन करावी व या समितीचे सर्व अधिकार अनुभवी असे खासदार श्री शरदचंद्र पवार साहेब यांना देण्यात यावे.
या पूर्वी दिनांक 30 सप्टेंबर 1993 रोजी महाराष्ट्रातील लातूर शहराजवळ किल्लारी भूकंप झाला होता.या भूकंपाने 53 गावे भुईसपाट झाली होती तेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असलेले शरदचंद्र पवार कित्येक दिवस भूकंपग्रस्त सोबतच राहिले व पुनर्वसनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या व आपत्तीवर मात केली.
दिनांक 26 जानेवारी 2001 रोजी गुजरात राज्यामध्ये देखील मोठा भूकंप झाला होता. भूकंपाची तीव्रता एवढी मोठी होती की वीस हजारांपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले होते तर दीड लाखापेक्षा जास्त जखमी झाले होते, लाखो घरे, शाळा, दवाखाने या भूकंपात नष्ट झाली होती. तेव्हा देशाचे पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी होते त्यांनी तीन फेब्रुवारी 2001 रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली अशा परिस्थितीचा अनुभव असलेले 1993 मुंबई बॉम्बस्फोट हल्ला व त्याच वर्षी झालेल्या लातूरमधील भूकंपानंतर ही सक्षम पणाने परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य शरद पवार यांच्याकडे असल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची घोषणा केली आणि सत्ताधारी विरोधक असा भेदभाव न करता या समितीची जबाबदारी शरदचंद्र पवार साहेबांकडे दिली.
         प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील केंद्र स्तरावर एक विशेस समिती स्थापन करावी आणि ज्येष्ठ व आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असे शरदचंद्र पवार यांना त्या समितीचे प्रमुख म्हणून अधिकार द्यावेत अशी विनंती राष्ट्रवादी युवक कॉग्रेस नाशिकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी पत्राद्वारे केली आहे.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी 'सुभाष मुळे' 
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment