तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 April 2020

सेनगाव तालुक्यातील बन बरडा येथील आशा वर्कर वर गावगुंडांचा हल्ला
 बाहेरगावावरून आलेल्या लोकांचा सर्वे करत असताना केली मारहाण

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

 सेनगाव तालुक्यातील बन बरडा  गावामध्ये आज आशा वर्कर बाहेरगावावरून आलेल्या लोकांचा सर्वे करत असताना काही गाव गुंडांनी आशा वर्कर महिलेला मारहाण केली आहे.
 प्रभावती सानप अस जखमी झालेल्या आशा वर्कर महिलेचं नाव आहे. काठीने मारहाण करून चावा  देखील घेतल्याचा आरोप या महिलेने केला आहे. याप्रकरणी अद्याप तरी कोणताही गुन्हा दाखल झाला नाहीये. सदरील महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर सेनगाव च्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. मारहाण झाल्याची तक्रार या महिलेने तालुका आरोग्य अधिकारी कडे दिली आहे.


तेजः न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment