तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 April 2020

*साई सेवाभावी संस्था साखरा यांच्यावतीने लँाकडावुन च्या काळात, साखरा तांडा येथे भाजीपाला वाटप


या संस्थेमार्फत असे अनेक सामाजिक उपक्रम नेहमीच राबवले जात असतात


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

आज दिनांक 11 एप्रिल रोजी, साई सेवाभावी संस्था, साखरा यांच्यावतीने साखरा तांडा इथे जाऊन, प्रत्येक घरी घरपोच भाजीपाला वाटप करण्यात आले.
सध्या कोरानो विषाणूमुळे जगभर थैमान घातले आहे, त्यामुळे पूर्ण भारत देश महाराष्ट्र राज्य लॉक डाऊनकरण्यात आलेला आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, साखरा तांडा, ही वस्ती साखरा येथून तीन किलोमीटर अंतरावर आहे. अनेक अशा वस्त्यांना, तसेच खेड्यांना गावांना. मार्केट साठी साखरा येथे यावे लागते, पण सध्या सर्वत्र लोकडाऊन, व जिल्हाधिकारी यांचे आदेश, पोलीस स्टेशन यांचे आदेश, यामुळे या भागातील अनेक गावातील लोकांना दिलेल्या आदेशानुसार पैदल भाजीपाला आणि किराणा सामान खरेदी साठी यावे लागत आहे. मात्र आज या संस्थेमार्फत भाजीपाला वाटप झाल्यामुळे साखरा तांडा येथील नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे, यावेळी साखरातांडा च्या वतीने  माजी सरपंच लहुजी राठोड, व गावकऱ्यांनी  या संस्थेचे आभार मानले आहेत. यावेळी या संस्थेचे अध्यक्ष डॉ,किरण चाकोते. मुंजाआप्पा भादलकर, बाबुराव पाटील, अशोक चाकोते, शेख दस्तगीर, देवचंद सरुळे आदींची उपस्थिती होती.


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment