तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 April 2020

रानटी प्राण्याने धूडगूस घातल्याने नागरिक भयभीत, १ जण जखमीसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १६ _ तालुक्यातील देवकी, देवकी, संगम जळगाव, आगरनांदर आदी भागात रानटी प्राण्याने धूडगूस घातला, त्यात एक जण जखमी झाला असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
        याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील देवकी, देवकी, संगम जळगाव, कोल्हेर आगरनांदर आदी भागातील परिसर गोदा काठचा असल्याने पाणीदार आहे. परिणामी बारमाही हा भाग हिरवळीने नटलेला असतो. येथील शेतकरी हे बाराही महिने शेतीतून पिक उत्पादन काढतात. या परिसराचे वैशिष्ट्ये लक्षात घेता हरण, काळवीट यांसह रानटी प्राणी हमखास आढळून येतात, परंतू गुरुवार, दि. १६ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास देवकी येथील सुळ या आडनावाच्या युवकावर एका रानटी प्राण्याने झडप घालून जखमी केले. हाताच्या दंडावर दातांचे वरखांडे बसल्याने काही प्रमाणावर रक्तश्राव झाल्याने गेवराई येथील रुग्णालयात प्रथमोपचार करून बीड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आमचे पत्रकार सुभाष मुळे यांना गावकऱ्यांनी दिली.
         घडलेल्या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्यानंतर काही कर्मचाऱ्यांची कुमक गावात दाखल झाली. बिबट्या, पडस की अन्य असा कोणता रानटी प्राणी होता हे मात्र लक्षात आले नाही, परंतू गेवराई तालुक्यातील देवकी, देवकी, संगम जळगाव, कोल्हेर आगरनांदर आदी भागातील शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले आहे हे मात्र नक्की.

╭══════════════╮
   🖋 सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
╰══════════════╯

No comments:

Post a comment