तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 12 April 2020

स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली ची धडक कारवाई पोलीस स्टेशन हिंगोली शहर भागात गावठी हातभट्टी दारू चा मोठा साठा जप्त


हिंगोली दि.१२(सा.वा.)
         हिंगोली जिल्ह्यात सध्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने अवैध्द धंदेवाल्याच्या विरोधात धडक कायॕवाही पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाकडुन करण्यात येत आहे.
          आज दि. १२ एप्रिल २०२० रोज रविवारला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग हिंगोली शहर रामेश्वर वैंजने, पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली,
          कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव दरम्यान हिंगोलीचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये लागू असलेल्या  लोकडॉऊन दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील लपून छपून चालणारे अवैध धंद्याची माहिती काढून स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांचे पथकाकडुन करण्यात येत आहे.आज दि.१२ एप्रिल ला पोलीस स्टेशन हिंगोली शहर अंतर्गत गावठी हातभट्टी वर छापे मारून कारवाई करण्यात आली.
पोलीस स्टेशन हिंगोली शहर हद्दीतील महादेव वाडी हिंगोली येथील शेख मेहबूब शेख जब्बार यांचे राहते घरी तो व त्याचा मित्र रवी माणिक काळे हे गावठी दारू काढून विक्री करत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्या वरून छापा मारला असता सदर ठिकाणी अंदाजे १००० लिटर मोहफुलाचे गुळ मिश्रित सडके रसायन किंमत  एक लाख  रुपयाचे, अंदाजे वीस लिटर गावठी हातभट्टी दारू  किंमती चार हजार रुपयाचे, व निळ्या रंगाच्या चार टाक्या लहान मोठ्या व निळ्या रंगाची एक कॅन अंदाजे दोन हजार रुपयाचे असे एकूण एक लाख सहा हजार रुपयाची मिळून आल्यावरून पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे शेख मेहबूब शेख जब्बार, रवी माणिक काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गावठी हातभट्टी दारूवर इतकी मोठी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.सदरील कायॕवाही पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे,पोलिस उपनिरीक्षक किशोर पोटे,पो.हे.काॕ.बालाजी बोके,विलास सोनवणे,मपोह रेश्मा शेख,पो.ना.संभाजी लेकुळे,सुनिल अंभोरे,भगवान आडे,किशोर कातकडे,विठ्ठल काळे,आकाश टापरे यांच्या पथकाने केली आहे.


No comments:

Post a comment