तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 April 2020

"मदत नव्हॆ कर्तव्य..!" रेणापुर येथे १०१ गरजूं कुटूंबाना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप.

किरण घुंबरे पाटील
पाथरी:-संपूर्ण देशात कोरोनाचे संकट घोंगावत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन केलेले आहे. लॉकडाऊन असल्या मुळे सर्वसामान्यांच्या पुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्वसामान्य गरजु कुटुंबांना मदत व्हावी, सामाजिक बांधिलकी, माणुसकीचे नाते टिकावे या सेवाभावी वृत्तीने 'मदत नव्‍हे कर्तव्य' या उपक्रमाअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचा संच शनिवार ११ एप्रिल रोजी रेणापुर येथे सर्व गरजूंना देण्यात आला. या लॉकडाऊन काळात कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी  प्रयत्नशील आहोत असे विक्रम गायकवाड यांनी सांगीतले. तसेच प्रत्येक गरजु व्यक्तीपर्यंत संच पोहोचवण्याची जबाबदारी माझे सहकारी, युवा कार्यकते ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी मंडळी, सामाजसेवक यांनी घेतली असल्याचे ते म्हणाले. यावेळी नारायण गोरे, कृष्णा हारके, बाबाराव वाघमारे, महादेव वाघमारे, दत्ता हारके, विठ्ठल पवार, केशव गायकवाड, सर्जेराव टेंगसे, रामेश्वर टेंगसे, अंगद टेंगसे, बालाजी गायकवाड,  अशोक भुतकर, अनिकेत गायकवाड, कुलदीप गायकवाड, माणिक गायकवाड, अनिल गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment