तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 8 April 2020

भगवती हॉस्पीटलच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त चेतन सेवांकुरमधील १५ अंध मुलांची तीन वषॕ मोफत आरोग्यसेवा -डाॕ जिवन नायक भगवतीकर*साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

      हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या भगवती येथील वैद्यकीय व्यवसायात अल्पावधीतच वाशिम सारख्या जिल्ह्याची ठिकाणी प्रगती करणारे डाॕ.जिवन नायक यांनी आपल्या दवाखान्याच्या द्वितीय वधाॕपन दिनानिमित्त केकतउमरा येथील चेतन सेवांकुरमधील १५ अंध मुलांची तिन वषॕ मोफत आरोग्यसेवा करणार असल्याचा संकल्प केला असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.                        सद्यस्थित संपूर्ण देशात कोरोना या आजाराने थैमान घातले असताना अनेक खाजगी डाक्टरानी आपले दवाखाने बंद केले आहे.मात्र हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील भगवती येथील ग्रामीण भागातुन आरोग्यसेवा, आश्‍वस्त वातावरण, प्रेमळ विचारपूस आणि रुग्ण व डॉक्टरांच्या अनामिक नात्यांचे पवित्र नाते जपणार्‍या वाशिम येथील भगवती हॉस्पीटलच्या व्दितीय वर्धापन दिनानिमित्त डॉ. जीवन नायक यांनी आपले सामाजीक उपक्रमात सलग दुसर्‍या वर्षीही सातत्य कायम राखुन  केकतउमरा येथील चेतन सेवांकुरच्या १५ अंध मुलांना तीन वर्ष सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा मोफत देण्याचा मानस जाहीर केला आहे.
  मागील वर्षभरात जिल्ह्यातील निराशेच्या गर्तेत सापडलेल्या अनेक रुग्णांना नवा आशेचा किरण ठरलेल्या शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील भगवती हॉस्पीटल ८ एप्रिल रोजी दुसर्‍या वर्षपुर्तीकडे वाटचाल करीत असून भगवती हॉस्पीटल हे उत्तम आरोग्य सेवेमुळे अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण ठरले आहे. आपल्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त बोलतांना डॉ. जीवन नायक म्हणाले की, रुग्णांचे दु:ख निवारण्याचे आम्ही माध्यम बनलो त्याचा आम्हाला आज खरोखर आनंद होत आहे. हे हॉस्पीटल उभारतांना जे स्वप्न आम्ही आणि आमच्या परिवाराने पाहले होते ते स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याचे आम्हाला समाधान लाभले आहे. हॉस्पीटलमध्ये सर्व तंत्रज्ञान आणि सुविधा असून हॉस्पीटलच्या व्दितीय वर्धापन दिनानिमित्त एक सामाजीक उपक्रम म्हणून ग्राम केकतउमरा येथील चेतन सेवांकुरच्या १५ अंध मुलांना तीन वर्ष मोफत सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा पुरविण्याचा मानस यावेळी डॉ. नायक यांनी व्यक्त केला. त्यांच्या या संकल्पनेतुन अंध १५ मुलांच्या जिवनात एक प्रकारे नवे जिवनच मिळत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले .तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment