तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 April 2020

पालमचे माजी सैनिक झाले सज्ज माजी सैनिक उतरले संरक्षणासाठी मैंदानात



अरुणा शर्मा


 पालम :- कोरोना विषाणूच्या संकटकाळातील आपतकालीन स्थितीमध्ये नागरिकांची सेवा करण्यासाठी पालम तालुक्यातील माजी सैनिक सज्ज झाले आहेत या संदर्भात माजी सैनिक संघटनेची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये माजी सैनिक संघटनेचे पदधिकारी सुभेदार काशीराम पौळ यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे ठराव संमत करण्यात आले लॉकडाऊनच्या परिस्थिती मध्ये पालम तालुक्यातील माजी सैनिक प्रशासनाला मदत करण्यासाठी रूजू झाले पोलीस प्रशासन, नगर पंचायत या कर्मचाऱ्या सोबत खांद्याला खांदा लावून हे  माजी सैनिक काम करत आहेत यात कॉप्टन डि.एस.वाघमारे, सुबेदार काशीराम पौळ, ए.स.आय. विलास वाघमारे, ए.स. आय नामदेव उगले हे कार्यकरत आहेत.

No comments:

Post a comment