तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 April 2020

पत्रकार देशपांडे यांना ग्रामीण पोलिसाकडून अमानुष मारहाण..!




पत्रकार बांधवांनी केला निषेध, कठोर कारवाईची मागणी 

कारंजा लाड:- येथील जेष्ठ पत्रकार तथा शेतकरी सुधीर देशपांडे हे फवारणी साहित्य शेतात जातांना घेऊन जात असताना 21 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान गंगापूर फाट्याजवळ ग्रामीण पोस्टे चे पोलिस उपनिरीक्षक वाघमोडे व पोलिस शिपाई नितीन ठाकरे व सतोष इंगळे यांनी दुचाकी थांबवून अमानुष पणे मारहाण केल्याचा घटना घडली.  वास्तविक पाहता ही हद्द शहर पोस्टे ची असतांना ग्रामीण पोस्टेचे अधिकारी व कर्मचारी चिरीमिरीसाठी हा प्रकार करून लोकशाहीला दाबण्याचा प्रकार होत आहे. 

पत्रकार सुधीर देशपांडे (वय 55) हे व त्यांचा पुतण्या शेतात टरबूज असल्याने फवारणी साहित्य घेऊन जात असताना पोलिस उपनिरीक्षक वाघमोडे,  शिपाई नितीन ठाकरे व सतोष इंगळे यांनी पत्रकारच आय कार्ड तसेच मास असतांना सुद्धा तुम्ही लॉकडाऊन मध्ये का फिरता, कोठे चालला असे म्हणून अपमानास्पद शब्दाचा वापर केला. तसेच पोलिसांच्या विरोधात बातम्या छापतो का? आता बरा सापडला आमच्या तावडीत असे म्हणून शिवीगाळ केली व पत्रकार देशपांडे यांची कॉलर पकडून खाली पाडले व मारहाण करण्या सुरूवात केली. देशपांडे यांच्या पाठीवर  व पायावर काठीने बेदम मारहाण केली. ऐवढेच नाहीतर देशपांडे यांचा अल्पवयीन असलेला पुतण्याला  सुद्धा मारहाण करून चोरासारख पोलिसांच्या गाडीत पकडून आणलं. वास्तविक पाहता ही घटना ज्या ठिकाणी घडली ती हद्द ग्रामीण पोलिसांची नसून शहर पोलिसांची आहे. नुसती चिरीमिरी कशी मिळते याकडे लक्ष ठेऊन सामान्य नागरका धमकावण्याचा प्रकार या काळात सुरू आहे.

या घटनेचा कारंजातील सर्व पत्रकार बांधवांनी निषेध नोंदवून त्या अधिकारी व कर्मचार्‍या विरुद्ध कार्यवाही व्हावी अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार व शहर व ग्रामीण चे ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनातून केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी संजय पाटील व तहसीलदार धीरज मांजरे ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये येऊन घटनेची माहिती जाणून घेतली संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे आश्‍वासन दिले. यावेळी कारंजातील सर्व पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.

No comments:

Post a comment