तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 April 2020

परळीत कोरोना संकटात शेतकऱ्यांनी शेवगाशेंगा वाटून दिला माणुसकीचा आधार
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.15 एप्रिल 2020 रोजी पिंपळगाव येथील शेतकरी दशरथ सोनवणे यांनी एक एकर मधील शेवगा शेंगा गरजू कामगारांना वाटपासाठी दिल्या.
सदरील शेतातील शेंगा तोडून सिरसाळा येथील वीटभट्टी कामगारांना तुळजाभवानी संस्थाच्या वतीने मोफत वाटप करण्यात आले. 
मदत हे दातृत्वशक्ती किंवा आर्थिक स्थितीवर अवलंबून नसते तर,अर्थिक मोहावर व आसक्तीवर अवलंबून असते.दान हे सत्पात्री व गरज असणाऱ्यांना व्यक्तिंना दिले पाहिजे. आज जवळपास कित्येक दिवस सगळ्यांचे उद्योग, व्यवसाय व नोकरी साऱ्यांचीच बंद आहे. त्यातच वीटभट्टी व्यवसाय ही बंद आहे.आहेत.अशावेळी अनेक मदतीचे हात येत आहेत.सरकारची ही मदत पोहोचण्यासाठी धडपड आहे. पण या भागात मोठ्या प्रमाणात वीटभट्टी कामगार आहेत. त्यामुळे काही ठिकाणी मदत अपुरी पडत आहे.
 किमान आपण सारे समाधानी आहोत की आपण सुखाने व्यवस्थित घरी बसून दोन वेळ जेवू शकतो. 
फार क्वचित अशी काही माणसं असतात मी तर त्यांना देवच मानतो. ज्यांना इतरांच दुःख पाहिलं की ते आपलं दुःख वाटत. आशा दुःख वाटून घेणाऱ्या लोकांची कोरनाच्या संकटामुळे गरज आहे.बाहेर जिल्ह्यातून आलेले वीटभट्टी कामगार यांचे खूप हाल होत आहेत.कोरोनाच्या भीतीमुळे शहरात जाणे शक्य नाही. आणि गावात पण काम लागणे अवघड आहे.अशा परिस्थितीमध्ये गरजूंना हात मदतीचा आधार माणुसकीचा देऊन आप आपल्या परीने सहकार्य करावे. अशी तुळजाभवानी संस्थेच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.

No comments:

Post a comment