तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 April 2020

सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे एक असामान्य व्यक्तीमत्व म्हणजे पुरुषोत्तम चितलांगे


मंगरूळपिर(फुलचंद भगत)-सामाजीक कार्यामध्ये आधिपासुनच स्वतःला झोकुन देणारे पुरुषोत्तम चितलांगे कोरोनासारख्या महामारीमध्येही लोकहिसाठी कार्य करीत आहेत.
             चितलांगे इंडेन गॅस एजन्सीच्या वतीने कोरोनापासून सुरक्षिततेसाठी सोशल डिस्टनसिंग च्या अंमलबजावणी सोबत ग्राहकांसाठी  सॅनिटायझिंग टनल चा शुभारंभ एजन्सी समोर प्रवेशद्वाराजवळ करण्यात आला. ग्राहकांनी आत प्रवेश केल्याबरोबर ग्राहकांच्या अंगावर 20 सेकंद पर्यंत सॅनिटायझिंग फवारे लागोपाठ उडत राहतात. या सेवेचा शुभारंभ मंगरुळपिर चे उप विभागीय अधिकारी माननीय  जयंत देशपांडे, तहसीलदार किशोर बागडे, न. प. उपाध्यक्ष प्रा. विरेंद्रसिंग ठाकूर, नगरसेवक विशाल लवटे, शाम खोडे, चितलांगे इंडेन चे संचालक पुरुषोत्तम चितलांगे, सुनील मालपाणी, सचिन पवार, किशोर भाऊ भुतडा, सतिषभाऊ हिवरकर, दिनेश वाघ, गणेश ढगे इत्यादी च्या सोशल डिस्टनसिंग ठेवत शुभारंभ झाला.ग्राहकांच्या सुरक्षिततेची काळजी घेवुन त्यांना ऊत्कृष्ट सेवा प्रदान करन्याचा चितलांगे नेहमीच प्रयत्न करीत असतात. चितलांगे इंडेन च्या या सेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007834/8459273206

No comments:

Post a comment