तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 April 2020

कोरोनाशी लढण्यासाठी परळी नगर परिषदेचे आणखी एक पाऊल ; सोडिअम हायकोक्लोराईड व जंतू नाशक फवारणीसाठी स्प्रिंकलर मशीन परळीत दाखल!परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोनाशी दोन हात करण्यासाठी परळी नगर पालिका सज्ज असून सुरक्षेच्या दृष्टीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

नगर परिषदेने सोडिअम हायकोक्लोराईड व जंतू नाशक फवारणीसाठी नवीन स्प्रिंकलर मशीन नुकतीच आणली असून आजपासून प्रत्यक्ष फवारणीला सुरुवातही करण्यात आली आहे.

या मशिनद्वारे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे व निर्जंतुकीरण करण्याच्या हेतूने फवारणी करण्यात येणार आहे. आज या मशीनचे परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री कदम, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. अरविंद मुंडे व न.प. स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती किशोर पारधे यांच्या हस्ते औपचारिक उदघाटन करण्यात आले. यावेळी राजा खान, संतोष रोडे, हाजी बाबू, माऊली मुंडे, शंकर साळवे श्रावण घाटे आदी उपस्थित होते.

ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा सौ. सरोजनी हालगे, गटनेते श्री वाल्मिक अण्णा कराड यांच्या चोख नियोजनातून याअगोदर परळीत स्वछता समिती मार्फत सॅनिटायझर, जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. आता या विशेष स्प्रिंकलर मशिनद्वारे शहरात सोडिअम हायको क्लोराईड फवारणी करण्यात येत असल्याचे न.प. मुख्याधिकारी अरविंद मुंडे तसेच स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती किशोर पारधे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment