तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 12 April 2020

जिल्हाधिकारी मुगळीकर यांच्या हस्ते गरजूंना अन्नधान्य वाटप;आ दुर्रानी यांचा उपक्रम

किरण घुंबरे पाटील
पाथरी:-कोविड-१९ मुळे देशात आणि राज्यात लॉक डाऊन जाहिर झाल्या नंतर पाथरी शहराच्या स्वच्छते सह नागरीकांचे आरोग्य आणि आहारा कडे आमदार बाबाजानी दुर्रांनी यांनी लक्ष दिले असून आपल्या सहकारी कार्यकर्ते नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून माहिती घेत शहरवाशीयांची काळजी घेतांना दिसत असून मंगळवार पासून दोनहजार चारशे एैशी गरजूंना जिवनाववश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात येत आहेत. रविवारी परभणीचे जिल्हाधिकारी मुगळीकर यांच्या उपस्थितीत दोनशे गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले.
या वेळी उपविभागिय अधिकारी व्हि एल कोळी, तहसिलदार यु एन कांगने, नगराध्यक्ष नितेश भोरे ,मख्याधिकारी यांच्या सह राकाँ पदधिकारी ,नगरसेवक यांची उपस्थिती होती.एक मिटर अंतराच्या चौकोनात तोंडाला मास्क बांधून गरजू हजर होते.प्रत्येक संकटात शहरवाशीयांना मदतीचा हात आज पर्यंत आ बाबाजानी दुर्रानी यांनी दिला आहे.गेले काही दिवसा पासून शहरातील परिस्थितीवर आ दुर्रानी यांचे बारकाईने लक्ष असून न प मार्फत वेळोवेळी ते नागरीकांच्या सुरक्षे साठी प्रयत्न करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या मार्फत सर्व्हे केल्या नंतर नावांची यादी केलेल्या कुटूंब प्रमुखांची एकच गर्दी होऊ नये या साठी दर दिवशी दोनशे जनांना बॅच वाटप करण्यात येत आहेत. रविवार १२ एप्रिल रोजी परभणीचे जिल्हाधिकारी मुगळीकर यांच्या हस्ते अन्न धान्यासह जिवनावश्यक वस्तूंचे किट गरजूंना देण्यात आले.

No comments:

Post a Comment